Views










*लोहारा, पाटोदा रोड चे खड्डे बुजविण्याचे काम नीकृष्ठ दर्जाचे झाले, तरी संबधीतावर कार्यवाही करण्यात यावी -- ओ.बी.सी.ऑर्गनाईझेशन लोहारा तालुका यांनी केली*


उस्मानाबाद/इकबाल मुल्ला 
 लोहारा ते पाटोदा रोडचे खड्डे बुजविण्याचे काम नीकृष्ठ दर्जाचे झाले आहे. तरी या कामाची चौकशी करुन अर्धवट झालेले काम संबंधित गुत्तेदारामार्फत चांगले करुन घेण्यात यावे. निकृष्ठ काम केलेल्या संबंधीतावर फौजदारी स्वरुपाचे गुन्हे दाखल करण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन ऑल इंडिया मुस्लिम ओ.बी.सी.ऑर्गनाईझेशन लोहारा तालुका यांच्या वतिने जिल्हा उपाध्यक्ष महेबुब फकिर यांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या दीड ते दोन महिन्यापूर्वी लोहारा तालुक्यामध्ये पाटोदा ते लोहारा रस्त्यावर पडलेली खड्डे बुजविण्याचे काम हे विद्यासागर व्ही.कामभोज सुशिलनगर जुना औसा रोड लातूर या गुप्तैदारामार्फत करण्यात आले असून सदर गुत्तेदाराने निकृष्ठ दर्जाचे व अर्धवट खड्डे बुजविण्याचे काम केले असून याबाबत काम चालू असतानाच सा.बां. उपविभाग लोहारा येथील संबंधित कर्मचारी यंना स्थळाच्या ठिकाणी दाखविण्यात आले होते. त्यांना तोंडी वेळोवेळी सांगण्यात आले होते. यावेळी अर्धवट राहिलेले काम करुन घेवू असे आश्वासन दिले. परंतु हे काम त्यांनी पूर्ण केलेले नाही. सदर कामाची आपण आपल्या स्तरावरुन पाहणी केल्यास निर्दशनास येईल. संबंधित गुत्तेदाराने आपल्या कार्यालयामार्फत जे नियमावली व अटी घालून दिलेले आहे त्याचे पालन केलेले दिसून येत नाही. मोठया आकाराचे खड्डे हे 50 मी.मी. जाडीच्या एम.पी.एस. सिलकोटसह भरलेले नाही. छोटे आकाराचे खड्डे हे सरफेस ट्रेनिंग सिलकोटसह भरलेले नाही. सदर डांबरी रस्त्याच्या बाजूपट्टया कठिण मुरुमाने भरलेले नाही व चढलेले बाजूपट्टया तासलेले नाही. कांही बाजूपट्टया हया डांबरी पृष्ठभागापेक्षा उंच झालेल्या आहेत. अशा ठिकाणचा पाणी निचरा होत नाही तशा बाजू पट्टया या तासलेल्या नाही, डांबरचा प्रमाण कमी केल्यामुळे संपूर्ण काम निकृष्ठ दर्जाचे झालेले असून संबंधि ठेकेदाराशी सा. बां.उप विभागाचे अधिकारी, कर्मचारी हे हातमिळवणी संगणमत करुन या गुत्तेदारास निकृष्ठ काम करण्यास मदत करीत आहेत असे दिसून येत आहे. तरी या कामाची तात्काळ चौकशी करुन संबंधीतावर कार्यवाही करण्यात यावी, अन्यथा ऑल इंडिया मुस्लिम ओ.बी.सी. ऑर्गनायझेशनच्या वतीने सा.बा.उप विभाग लोहारा कार्यालयाच्या समोर अमरण उपोषण करण्यात येईल, असे निवेदनात म्हटले आहे. या निवेदणाच्या प्रति सा.बा विभाग उस्मानाबाद, सा.बा. उपविभाग लोहारा यांना देण्यात आल्या आहेत.

 
Top