Views




*सह्याद्री मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल उस्मानाबाद येथे कोरोना - 19 लसीकरण केंद्र सुरु, (शासकीय निर्देशानुसार लसीकरणासाठी नाममात्र 250/ ₹ दर ठेवण्यात आला आहे.)*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला
उस्मानाबाद शहरातील सह्याद्री हॉस्पिटल्स येथे प्रशासनाच्या सूचने नुसार वय वर्षे 60 वरील सर्व नागरिकांसाठी आणि 45 ते 60 वयोगटातील आजारी नागरिकांसाठी (मधुमेह, उच्च रक्तदाब, इत. आजारांनी ग्रस्त) यांच्यासाठी कोरोना - 19 लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. लसीकरणाचा शुभारंभ जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.धनंजय पाटील व 'सह्याद्री' च्या संचालिका डॉ.वसुधा दापके - देशमुख यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी प्रथम लसीकरणाचा मान जेष्ठ नागरिक संतोष विद्याचंद्र गांधी यांना पोर्टलवर अधिकृत नोंद करून देण्यात आला. उस्मानाबाद जिल्ह्यातील नागरिकांनी कोवीड 19 लसीकरणास येताना आधार कार्ड/पॅन कार्ड घेऊन यावे तसेच कोवीड -19 निर्मूलनासाठी ही लस पूर्ण सुरक्षित आहे, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.धनंजय पाटील यांनी सांगितले. 'सह्याद्री' चे प्रशासकीय अधिकारी डॉ.प्रकाश शेलार डॉ.सचिन गायकवाड, डॉ.पूजा, बालाजी कानवटे, रणजीत जाधव, हनुमंत साळूंके, सचिन वाळवे, ऋषीकेश माळी यांच्या मार्गदर्शनाखाली covid - 19 लसीकरण केंद्राचे कामकाज चालू आहे.
 
Top