Views

*अखिल भारतीय छावा संघटनेच्या उस्मानाबाद शहराध्यक्ष पदी दादासाहेब विष्णू कोरके*

उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

अखिल भारतीय छावा संघटनेच्या उस्मानाबाद शहराध्यक्ष पदी दादासाहेब विष्णू कोरके यांची निवड करण्यात आली आहे. लातुर येथे झालेल्या राज्यव्यापी बैठकिमध्ये छावा संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन निवड करण्यात आली. तसेच यावेळी उपशहराध्यक्ष पदी बबन भोईटे, शहरकार्याध्यक्ष पदी राहुल पवार, शहरसचिव पदी ज्योतिराम काळे यांचीही निवड करून नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी अखिल भारतीय छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष शशिकांत बाबासाहेब बनसोडे, यांच्यासह भारतीय छावा संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. या निवडीबद्दल यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
 
Top