Views
*राम मंदिर निर्माणासाठी जेवळीत भव्य रामदिंडी*

उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)


अयोध्या येथे निर्माण होत असलेल्या भव्य अशा राम मंदिराच्या निर्माण कार्यासाठी संपूर्ण भारतभर श्रीराम मंदिर निधी समर्पण अभियान चालू आहे, त्याच अनुषंगाने लोहारा तालुक्यातील जेवळी येथे निधी समर्पण समितीचे जिल्हा उपाध्यक्ष सिद्धेश्वर विरक्त मठ जेवळीचे मठाधिपती म.नी.प्र.गुरु गंगाधर महास्वामीजी यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य अशी रामदिंडी काढण्यात आली. यामध्ये राममंदिर संदर्भात ध्वनीपेक्षकाद्वारे थोडक्यात इतिहास सांगण्यात आला. या राम दिंडीमध्ये राम, लक्ष्मण, सीता, हनुमान अशा सजीव 8 प्रतिकृत्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले. परिसरातील रुद्रवाडी, हिप्परगा सय्यद, फनेपुर, दक्षिण जेवळी, मोघा खुर्द, वडगाव गांज्या, उत्तर जेवळीतील सर्व भजनी मंडळी सहभागी झाले होते. टाळ, मृदंगाच्या आवाजाने संपूर्ण गावाचे वातावरण भक्तिमय झाले होते. राम दिंडी छत्रपती हनुमान मंदिर ते अनुक्रमे श्रीराम मंदिर, बालाजी मंदीर, विठ्ठल रुक्मिणी मंदिर, हनुमान मंदिर, सरस्वती मंदिर, मल्लिकार्जुन मंदिर आणि सांगता महादेव मंदिरात झाली. दिंडी मार्गात सर्व महिलांनी रांगोळी, सडा, पाण्याचे शिंपडणे, परिसर स्वच्छता, दिंडीपूजन करून राम दिंडीचे स्वागत केले. कार्यक्रमाच्या शेवटी महादेव मंदिरात विश्व् हिंदू परिषदेचे जिल्हा अध्यक्ष दत्तात्रय चौरे, पालक बाबुराव पुजारी, सहमंत्री परमेश्वर शिंदे यांचे राम मंदिर संदर्भात भाषण झाले. यावेळी राम मंदिर निर्माण अभियानाचे तालुका अभियान प्रमुख मुरलीधर बसवंत होनाळकर, तसेच तालुका समितीचे सुधीर कोरे, किशोर होनाजे, बालाजी चव्हाण, दत्तात्रय दंडगुळे, शहाजी जाधव, मनोज तीगाडे, शंकर जाधव, दत्ता पोतदार इत्यादी उपस्थित होते. रामदिंडी यशस्वी करण्यासाठी चंद्रकांत ढोबळे, नंदकुमार वेदपाठक, मनोहर माळी, परमेश्वर तोरकडे, प्रफुल्ल कानडे, बाळासाहेब कटारे, उदय कुलकर्णी, श्रीशैल बिराजदार, सत्येश्वर ढोबळे, चेतन शिंदे अविनाश कोरे, श्रीनिवास बुरावर, भोजाप्पा कारभारी, खंडू कारभारी, प्रकाश सिंदखेडे, योगीराज सोळसे, बालाजी चव्हाण, किशोर होनाजे, सुधीर कोरे यांनी परिश्रम घेतले.
 
Top