Views


*नगरसेवक आरिफ खानापुरे यांच्या वतीने लोहारा शहरातील प्रभाग क्रमांक 16 मध्ये 100 कुटुंबांना प्रत्येक घरांमध्ये 12 लिटर चे 2 डस्टबिन वाटप*

उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)


लोहारा शहरातील नगरसेवक आरिफ हारून खानापुरे यांच्या वतीने प्रभाग क्रमांक 16 मध्ये प्रभागातील 100 कुटुंबांना प्रत्येक घरांमध्ये 12 लिटर चे 2 डस्टबिन देण्यात आले. एक डस्टबिन ओला कचरा एक डस्टबिन सुका कचऱ्यासाठी वापरण्यात यावा, नागरीकांनी ओला कचरा व सुका कचरा वेगवेगळा गोळा करून घंटागाडीतच देऊन सहकार्य करुन आपले प्रभाग स्वच्छ ठेवावे, असे आवाहन नगरसेवक आरिफ खानापुरे यांनी केले आहे. या प्रभागात डस्टबिन वाटप केल्यामुळे नागरीकांतुन समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
 
Top