Views
*कळंब येथे भाजपाचे महावितरण विरोधात “ टाळा ठोको व हल्लाबोल ” आंदोलन*

उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

संपुर्ण लॉकडाउनच्या काळात महावितरणने अव्वाच्या सव्वा बिले देवून महाराष्ट्रामधील जनतेची क्रुर चेष्टा केलेली आहे. तसेच ७५ लाख ग्राहकांना नोटीस पाठवून ४ कोटी जनतेला अंधारात ठेवण्याचे पाप हे महाआघाडी सरकार करत आहे. शेतीसाठी पण सध्या विजेचा तुटवडा आहे. या अन्यायाविरोधात भारतीय जनता पार्टी तर्फे धाराशिव जिल्हयात महावितरणच्या विरोधात टाळा ठोको व हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. कळंब येथे हे आंदोलन भाजपा माजी जिल्हाध्यक्ष तथा लातूर शहर जिल्हा प्रभारी दत्ताभाऊ कुलकर्णी, जिल्हा सरचिटणीस प्रदीप शिंदे, कळंब तालुकाध्यक्ष अजित दादा पिंगळे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष प्रा.दिलीप पाटील, किसान मोर्चा जिल्हा संयोजक संजय पाटील, तालुका सरचिटणीस संजय जाधवर, माणिक बोंदर, संतोष कसपटे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष प्रशांत लोमटे, अरुण चौधरी, रामहरी शिंदे, नानासाहेब यादव, संदीप बाविकर, मीनाज शेख, सतपाल बनसोडे, शिवाजी गिड्डे, मकरंद पाटील तसेच कळंब तालुका भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
 
Top