Views*हराळी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी नवतरुण ग्रामविकास पँनलचे सौ.वैशाली सूर्यवंशी तर उपसरपंच पदी पँनल रवींद्रदादा पाटील सुर्यवंशी*

उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

लोहारा तालुक्यातील हराळी येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी नवतरुण ग्रामविकास पँनलचे सौ.वैशाली
 सूर्यवंशी तर उपसरपंच पदी पँनल प्रमुख रवींद्रदादा पाटील सुर्यवंशी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ग्रामपंचायतीच्या कार्यालयात सरपंच, उपसरपंच निवडीसाठी ग्रामपंचायत सदस्यांची विशेष सभा घेण्यात आली. यावेळी अध्यासी अधिकारी म्हणून निंबाळकर उपस्थित होते. यावेळी ग्रामसेवक मुंढे, यांच्यासह नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.सरपंच पदासाठी नवतरुण ग्रामविकास पँनलचे सौ.वैशाली सूर्यवंशी व उपसरपंच पदासाठी रवींद्रदादा पाटील सुर्यवंशी यांचेच अर्ज दाखल असल्याने यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नवनिर्वाचित सरपंच व उप सरपंच व सर्व सदस्यांचा शिवसेना युवा नेते किरण गायकवाड, युवा नेते तथा
 माजी जि.प.सदस्य दीपक जवळगे, सचिन सुर्यवंशी मित्र मंडळ व हराळी ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी नवनिर्वाचित सदस्य रघुनाथ बिराजदार, सौ.सुलोचना बिराजदार, सौ.कविता धाडवे, युवराज पाटील, सुरेश सुर्यवंशी, सुभाष बिराजदार, सचिन सुर्यवंशी, विकास सुर्यवंशी, दिलीप सुर्यवंशी, रवी सोनवणे, व्यंकट सुर्यवंशी, विलास सूर्यवंशी, राजकुमार धानुरे, बाबुराव सुर्यवंशी, गोविंद धानुरे, गुज्जर शेख, शरद सूर्यवंशी, ज्ञानेश्वर सुर्यवंशी, मनोज पाटील, सुरज सुर्यवंशी, अमित रनखांब, गणेश पाटील, यांच्यासह ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अनिल बिराजदार यांनी केले तर आभार उपसरपंच रवींद्र पाटील यांनी मानले.
 
Top