Views
*शेती वीजबिल सक्तीने वसुलीच्या विरोधात भारतीय जनता पार्टीच्या वतीने मागणी*

कळंब:-(प्रतिनिधी)

शेती वीजबिल सक्तीने वसुलीच्या विरोधात भारतीय जनता पार्टीच्या वतीने मुख्यमंत्र्यांना निवेदन..
    खरीप हंगामात हातातोंडाशी आलेला घास परतीच्या पावसाने हिसकावून घेतल्या नंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन अनुदानाची घोषणा केली व शेतकऱ्या प्रती असलेला आदर दाखवला परंतु हे घेतलेले सोंग जास्त दिवस चालले नाही. आता रब्बी चे पीक शेतात बहरत असताना महा विकास आघाडीने रझाकारी पद्धतीने वीज बिलाची सक्तीची वसुली करत शेतकऱ्यांना अडचणीत आणले आहे व वीज कनेक्शन तोडण्याची मोहीम हाती घेतली आहे या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी कळंब तालुक्याच्या वतीने उपविभागीय अधिकारी कळंब यांच्यामार्फत रझाकारी वसुली थांबविण्याकरिता निवेदन देण्यात आले या निवेदनावर भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष अजित पिंगळे,रामहरी शिंदे,भागचंद बागरेचा,मिनाज शेख,प्रशांत लोमटे आदि ने स्वाक्षऱ्या केल्या
 
Top