Views




*राज्यातील बी.पी.एल, अंत्योदय, अन्नपूर्णा, केशरी ,शुभ्र व आस्थापना कार्ड या सर्व प्रकारच्या शिधापत्रिकांची तपासणी*

कळंब:-(प्रतिनिधी)

राज्यातील बी.पी.एल, अंत्योदय, अन्नपूर्णा, केशरी ,शुभ्र व आस्थापना कार्ड या सर्व प्रकारच्या शिधापत्रिकांची तपासणी करण्यासाठी शोध मोहीम दिनांक 01.02 2021 ते दिनांक 30.04.2021 या कालावधी मध्ये राबविण्यात येणार आहे.
       अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे शासन परिपत्रक क्र.शिवाप2021 /प्र. क्र.04/नापू-28 दिनांक 28 जानेवारी 2021 अन्वये सार्वजनिक वितरण व्यवस्था(नियंत्रण)आदेश 2015 मधील तरतुदीनुसार अपात्र शिधापत्रिका शोधून रद्द करण्याकरिता खास शोध मोहीम राबवणे बाबत आदेशित करण्यात आलेले आहे.राज्यातील बी.पी.एल, अंत्योदय, अन्नपूर्णा, केशरी ,शुभ्र व आस्थापना कार्ड या सर्व प्रकारच्या शिधापत्रिकांची तपासणी करण्यासाठी शोध मोहीम दिनांक 01.02 2021 ते दिनांक 30.04.2021 या कालावधी मध्ये राबविण्यात येणार आहे.
     सदरील तपासणी ही त्या-त्या विभागातील /कार्यालयातील रास्त भाव /अधिकृत शिधावाटप दुकानातून शासकीय कर्मचारी /तलाठी यांचे मार्फत राबविण्यात येणार आहे. त्यानुसार शासकीय कर्मचारी/ तलाठी हे संबंधित रास्त भाव दुकानात जोडलेल्या शिधापत्रिकाधारक कडून माहिती भरून दिलेले फॉर्म स्वीकृत करून अर्जदाराची स्वाक्षरी व दिनांकासह पोहोच देतील .
     फॉर्म भरून देताना फॉर्मसोबत शिधापत्रिकाधारकांनी खालील पुरावे झेरॉक्स प्रती कुटुंब प्रमुखाचे सहीने देणे बंधनकारक आहे.
  ते त्या भागात राहात असल्याचा पुरावा द्यावा पुरावा म्हणून उदा:-भाडे पावती(ज्या घर मालकाकडे भाड्याने राहत आहेत त्यांचा घर भाडे पावती लाईट बिल, 8अ/PTR), निवासस्थानाच्या मालकी बद्दलचा पुरावा, एल.पी.जी .जोडणी क्रमांक, बॅक पासबुक, विजेचे देयक, टेलिफोन /मोबाईल क्रमांक ,ड्रायव्हिंग लायसन्स ,ओळखपत्र(कार्यालय/इतर),मतदार ओळखपत्र, आधार कार्ड इत्यादीच्या प्रति द्याव्यात. तसेच दिलेला पुरावा हा एक वर्षा पेक्षा जास्त कालावधी पेक्षा जुना नसावा उपरोक्त फार्मची तहसील कार्यालय तपासणी करण्यात येणार असून ,त्यानुसार छाननी केल्या नंतर पुरेसा पुरावा असलेल्यांची यादी गट अ म्हणून करण्यात येईल .तर गट ब मध्ये पुरावा न देणाऱ्यांची यादी तयार करण्यात येईल, गट-अ यादीत शिधापत्रिकाधारकांची पत्रिका पूर्ववत चालू/ कार्यरत राहील तर गट ब यादीतील शिधापत्रिका त्वरित निलंबित करण्यात येतील अशा गट ब यादीतील शिधा पत्रिकेवर शेगाव वस्तू देण्याचे त्वरित थांबविण्यात येईल. गट-ब मध्ये पुरावे न दिलेले कार्डधारकांना पुरावे देण्यास 15 दिवसाची मुदत देण्यात येईल ,व पडताळणी करून पुरावे अप्राप्त शिधापत्रिका रद्द करण्यात येतील त्यानुसार दुकानदाराचा देण्यात येणाऱ्या नियत नाद कपात करण्यात येईल तसेच पुराव्याची छाननी करताना संशयास्पद वाटणाऱ्या शिधापत्रिका च्या पुराव्या बाबत पोलिसांकडून तपासणी करून घेण्यात येणार आहे विदेशी नागरिकांना एकही शिधापत्रिका दिली जाणार नाही.तसेच शिधापत्रिकांची तपासणी करताना ज्या शासकीय/ निमशासकीय कार्यालयातील/ खाजगी कंपनीतील कर्मचारी /कामगार यांचे ज्ञात वार्षिक उत्पन्न रुपये एक लाख पेक्षा जास्त असेल अशा कर्मचाऱ्यांच्या शिधापत्रिका तात्काळ अपात्र ठरवून त्या रद्द करण्यात येतील व त्यांच्या मागणी नुसार त्यांना अन्य अनुज्ञा पत्रिका देण्यात येतील तसेच दुबार अस्तित्वात नसलेल्या व्यक्ती स्थलांतरित व्यक्ती मयत व्यक्ती या लाभार्थ्यांना ची नावे वगळण्यात येणार आहेत,त्यानुसार कळंब तालुक्यातील सर्व शिधापत्रिकाधारकांनी त्यांची सत्य व खरी माहिती तपासणीसाठी येणारा अधिकारी यांना पुरवावी असे तहसीलदार कळंब यांच्या वतीने आव्हान करण्यात येते.
 
Top