Views


*लोहारा नगरपंचायतीच्या प्रभागातील सदस्यांच्या आरक्षणाची सोडत तहसील कार्यालयात शांततेत सुरळीत पार पडली*

उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

लोहारा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुक 2021 प्रभागातील सदस्यांच्या आरक्षणाची सोडत दि.10 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी 11 वाजता लोहारा तहसील कार्यालयातील सभागृहात शांततेत सुरळीत पार पडली. यावेळी पिठासीन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले यांच्या अध्यक्षतेखाली लहान मुलींच्या हस्ते चिठ्ठी काढून नगरपंचायतच्या प्रभागातील सदस्यांचे आरक्षण काढण्यात आले. यावेळी तहसीलदार संतोष रूईकर, मुख्याधिकारी गजानन शिंदे, न.पं. कार्यालयीन अधीक्षक जगदिश सोंडगे, लेखापाल दिपक मुंडे, नवनाथ लोहार, आदि, उपस्थित होते. यावेळी एकुण 17 जागांपैकी इतर मागास प्रवर्गासाठी 5 तर अनुसूचित जातीसाठी 2 जागा आरक्षीत करण्यात आल्या आहेत.10 जागा सर्वसाधारणसाठी असुन यात 5 जागा महिलांसाठी आरक्षीत करण्यात आले आहे. यावेळी प्रभाग क्रं.1 सर्वसाधारण, प्रभाग क्रं.2 सर्वसाधारण, प्रभाग क्रं.3 सर्वसाधारण, प्रभाग क्रं.4 सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रं.5 सर्वसाधारण, प्रभाग क्रं.6 सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रं.7. सर्वसाधारण, प्रभाग क्रं.8 नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, प्रभाग क्रं.9.नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, प्रभाग क्रं.10.नागरिकांचा मागास प्रवर्ग, प्रभाग क्रं.11.अनुसुचित जाती महिला, प्रभाग 12.अनुसुचित जाती, प्रभाग क्रं.13.नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, प्रभाग क्रं.
14.सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रं.15.नागरिकांचा मागास प्रवर्ग, प्रभाग क्रं.16.सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रं.17. 
सर्वसाधारण महिला, या प्रवर्गासाठी नगरपंचायतच्या सदस्यांचे आरक्षण निश्चित करण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्ष प्रताप घोडके, गटनेते अभिमान खराडे, युवासेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, शिवसेना शहरप्रमुख सलीम शेख, शब्बीर गवंडी, महेबुब गवंडी, मल्लिनाथ घोंगडे, नगरसेवक गगन माळवदकर, बाळासाहेब कोरे, शाम नारायककर, दिपक मुळे, युवासेना शहरप्रमुख श्रीकांत भरारे, युवक काँग्रेस शहराध्यक्ष हरी लोखंडे, बाळासाहेब पाटील, दिपक रोडगे, भाजपा जिल्हा चिटणीस विक्रांत संगशेट्टी, भाजपा तालुका सरचिटणीस नेताजी शिंदे, प्रशांत काळे, शंकर मुळे, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष आयुब शेख, दगडू तिगाडे, कमलाकर सिरसाट, श्रीशैल्य मिटकरी, गणेश काडगावे, यांच्यासह नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Top