Views




*राज्यातील सरकारला गोर-गरीब जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष देण्यास वेळ नाही, तिघाडी सरकार आप आपले वर्चस्व गाजवण्यात व्यस्त आहेत -- समाजसेवक रामलिंग पुराणे*

उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)
  
महाराष्ट्र राज्यातील होमगार्डवर वारंवार संकट कोसळत आहेत, गेल्या पाच वर्षांपासून राज्यातील होमगार्ड समस्यांनी ग्रासले आहेत, आपत्ती काळात कार्य करणारी मानसेवी संघटना १९४६ ला स्थापना करण्यात आली आणि विशेष म्हणजे महाराष्ट्रातच त्याचे उगम झाले आज त्याच महाराष्ट्रात होमगार्डचे दयनीय अवस्था झाले आहे, सरकारला वारंवार निवेदन देऊन, आंदोलने करून अद्याप शासनाने त्याची गांभीर्याने दखल न घेल्यामुळे समाजसेवक रामलिंग पुराणे यांनी परत एकदा आंदोलनाचे रणशिंग फुंकले आहे, यापूर्वी ते दि.०५ जानेवारी २०२१ रोजी राज्याचे मा.राज्यपाल यांची भेट घेऊन सरकार कायद्याचा उल्लंघन करत असल्याचे निदर्शनास आणून दिले होते आणि त्यावर मा.राज्यपाल यांनी दखल घेऊन राज्याच्या मुख्य अतिरिक्त सचिवांना पुढील कारवाई साठी पत्र पाठवून कळवले असल्याचे पत्र पुराणे यांना प्राप्त झाले आहे. राज्यातील होमगार्डना न्याय मिळवून देण्यासाठी समाजसेवक पुराणे गेले एक वर्षा पासून लढा देत आहेत, आझाद मैदान मुंबई येथील पुराणे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन दरम्यान राज्याचे गृहराज्यमंत्री यांच्या आश्वासनंतर व अर्थसंकल्पीय अधिवेशन नंतर बैठक लावण्याच्या अटीवर आंदोलन मागे घेण्यात आले होते. परंतु अद्याप गृहराज्यमंत्री यांना बैठक लावण्यास वेळ मिळत नसल्यामुळे, त्यांनी फसवणूक केल्याचा ठपका पुराणे यांनी लावला आहे, दि.२४ फेब्रुवारी २०२१ पासून समाजसेवक रामलिंग पुराणे हे मुरूम ता.उमरगा जि.उस्मानाबाद येथे आमरण उपोषण सुरू करत असल्याचे पत्र राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री,गृहराज्यमंत्री व तसेच माहितीसत्व प्रत उस्मानाबाद जिल्हाधिकारी व उस्मानाबाद पोलीस अधीक्षक यांना निवेदन पाठवून मागण्या मान्य झाल्यास आंदोलनाचा ईशारा दिला आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, जानेवारी २०२० पासून आम्ही शासनास वारंवार संविधानिक पाठपुरावा करीत आहोत पण अद्याप शासन दरबारी त्याची गांभीर्याने दखल घेतली जात नाही, दि.२४ फेब्रुवारी २०२० रोजी च्या आझाद मैदान मुंबई येथील दोन दिवसीय आंदोलन दरम्यान राज्याचे गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या भेटीनंतर व अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर बैठक लावू या आश्वासना नंतर आंदोलन मागे घेण्यात आले होते, परंतु अद्याप कसल्याही प्रकारचे हालचाल गृहराज्यमंत्री यांनी केली नाही, एक प्रकारे त्यांनी फसवणूक करून राज्यातील गोर-गरीब होमगार्डची समस्या आपल्या सरकार मार्फत सोडवण्यासाठी आपण असमर्थ असल्याचे स्पस्ट दिसून येत आहे. आपण सरकार या राज्यातील जनतेचे माय-बाप म्हणून आपणास वारंवार पाठपुरावा करून ही अद्याप आपण याची गांभीर्याने दखल घेत नाहीत आणि आपल्या काळातील अधिकारी वर्ग ही कामाला वेग देत नाहीत, जर सरकारच न्याय देत नसेल त्याला यशस्वी सरकार कसे म्हणायचे, राज्यातील होमगार्ड ही या राज्याचे नागरिक नाहीत का? यापूर्वीही जे मागण्या आम्ही मांडलो होतो तेच मागण्या घेऊन मी स्वतः रामलिंग पुराणे दि.२४ फेब्रुवारी २०२१ पासून सरकारच्या निषेधार्थ मुरूम ता.उमरगा जि. उस्मानाबाद येथे आमरण उपोषण आंदोलन छेडत आहे त्याला पूर्णपणे शासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी, असे निवेदनात म्हटले आहे.
मागण्या
1) विविध कारणांनी अपात्र होमगार्डना त्वरित विनाअट कामावर रुजू करून घ्यावे, 
2) कायमस्वरूपी 365 दिवस कामावर घ्यावे.
3) बंदोबस्त मानधन आठवडाभरात द्यावे, 
4)पोलीस खात्यातील 5% आरक्षण वरून 15% आरक्षन करावे, 
5) तीन वर्षांनी होणारी पुनरनोंदनी/पुनर्नियुक्ती पध्द्त बंद करावे, 
6) जिल्हा समादेशक/मानसेवी पद पूर्वरत ठेवावे,आंदोलकावरील झालेली कार्यवाही त्वरित मागे घ्यावे 
7) विविध कारणांनी कामावरून काडून टाकण्यात आलेल्या समादेशक/इतर अधिकाऱ्यांना परत नियुक्ती द्यावे.
8) पोलीस प्रशासनास जी आपत्तीजनक विमा रक्कम मंजूर आहे त्यात होमगार्डचा ही समावेश करावा.
9) ३० जुलै २००९ च्या शासन निर्णयात बदल करून २ लक्ष रुपये विमा ऐवजी २०२० च्या चालू महागाई नुसार २० लक्ष रुपये करावे व तसेच परिवाराला लघु उद्योग साठी तात्काळ देण्यात येणारे १० हजार रुपये ऐवजी १ लाख रुपये देण्यात यावे व त्यांच्या पाल्याचा शिक्षण खर्चही वाढवून द्यावे.
10) प्रशिक्षण घेऊनही अद्याप त्यांना प्रमाणपत्र देण्यात आले नाहीत, त्यांना पोलीस भरतीत आरक्षण नुसार समाविष्ट करून घ्यावे.
11) महासमादेशक यांनी नेमलेली तीन सदस्यीय समिती रद्द करून नवीन समिती नेमणे.
वरील मागण्याचा तात्काळ विचार करून राज्यातील होमगार्ड समस्या सोडवावे ही विनंती, सरकार गोर-गरीब जनतेला न्याय देण्यासाठी असतो त्यांचा आवाज दाबण्यासाठी नाही, कृपया सरकारने यावर गांभीर्याने विचार करावे ही विनंती...नागरिकांच्या समस्या प्रलंबित असताना, जनता दरबाराच्या नावाने काय सिद्ध करू इच्छिता? असे निवेदनात सरकार वर कडाडून टीका केली आहे.
----------------------------------------------------------------------
राज्यातील सरकारला गोर-गरीब जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष देण्यास वेळ नाही, तिघाडी सरकार आप आपले वर्चस्व गाजवण्यात व्यस्त आहेत, त्यामुळे नागरी समस्या प्रलंबित राहत आहेत, तर दुसरीकडे मात्र बुडाखालील अंदार झाकण्यासाठी "जनता दरबाराच्या नावाने, नागतिकांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम चालू आहे, अनेक नागरी समस्या प्रलंबित असतांना, जनता दरबार घेऊन सरकार काय सादय करू इच्छिते असा प्रश्न ही निर्माण होतो, सद्याच सरकारचे काम म्हणजे असं झालंय पुढचे पाठ आणि मागचे सपाट असे कार्य सद्या चालू आहे, तिघाडी आणि काम बिघाडी सरकार मुळे, एक धड ना भारा भर चिंद्या अशी परिस्थिती झाली आहे आणि त्यामुळे त्याचा फटका सामान्य नागरिकांना बसत आहे - रामलिंग पुराणे, समाजसेवक तथा अध्यक्ष बसव प्रतिष्ठाण
 
Top