Views
*समाज्यातील शेवटच्या घटकाच्या उत्कर्शासाठी भटक्या विमुक्तांनी ताकतीने काम करावे - नरेंद्र पवार*

उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

समाज्यातील शेवटच्या घटकाच्या उत्कर्शासाठी भटक्या विमुक्तांनी ताकतीने काम करावे, असे प्रतिपादन प्रदेश भाजपाच्या भटक्या विमुक्त आघाडीचे प्रदेशाध्यक्ष कल्याण पुर्वचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केले.भाजपा कार्यालय, प्रतिष्टान भवन, उस्मानाबाद येथे प्रदेश भाजपाच्या भटक्या विमुक्त आघाडीचे प्रदेशाध्यक्ष कल्याण पुर्वचे माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपाच्या भटक्या विमुक्त आघाडीची कार्यकारणी जाहीर करण्यात आली व नुतन पदाधिकारी यांचा सत्कार समारंभ कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे होते तर प्रमुख म्हणून भाजपाचे बुध्दीजीवीचे संयोजक तथा माजी जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, भटक्या विमुक्त आघाडीच्या महिला प्रदेशाध्यक्षा डाॅ.उज्वलाताई हाके, युवती प्रदेशाध्यक्षा अॅड. भाग्यश्री ढाकणे, युवा प्रदेशाध्यक्ष अमोल गायकवाड, भाजपाच्या भटके विमुक्त आघाडीचे जिल्हाध्यक्ष सिताराम वनवे, सरचिटणीस अॅड.नितीन भोसले, प्रदिप शिदे, आदि, उपस्थित होते. या कार्यक्रमांची सुरूवात प्रमुख पाहूण्यांच्या स्वागताने करण्यात आली. आघाडीचे जिल्हाध्यक्ष सिताराम वनवे यांनी प्रास्ताविक करून जिल्हा कार्यकारणी प्रसिध्द केली. नवनियुक्त पदाधिकारी यांचे माजी आ.नरेंद्र पवार यांच्या हस्ते नियुक्ती पत्र व पुश्पहार व गुच्छ देवून अभिनंदन करण्यात आले. नवनियुक्त पदाधिकारी यांना मार्गदर्षन करताना भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी सर्वांचे अभिनंदन करून शुभेच्छा व्यक्त केल्या व वाडी, वस्ती तांडा, गाव, वार्ड, शहरापर्यंत भाजपा वाढविण्यासाठी आपण कार्य करावे असे आवाहन केले. प्रदेशाध्यक्ष नरेंद्र पवार यांनी सामाजिक दायित्व तसेच राश्ट्रांच्या विकासासोबत समाजातील सर्व भटके व विमुक्तांच्या उन्नतीसाठी त्याचप्रमाणे समाजाच्या शेवटच्या घटकांच्या उत्कर्शासाठी आपण एकत्र येवून काम करण्याचे आवाहन केले. राश्ट्र बांधणी मध्ये भटके आणि विमुक्त समाजेचे असलेले महत्व विषद केले. भाजपा प्रणित केंद्र सरकार ने नेमलेल्या दादा इधाते आयोगाच्या शिफारशी लागू करण्याबाबत घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली. समाज बांधवांनी समाजाच्या हितासाठी पुर्ण ताकतीसह भाजपाच्या सोबत रहावे. तरच सर्वात शेवटच्या व्यक्तीच्या जीवनात सुख समृध्दी नांदेल असा आशावाद व्यक्त केला. भाजपा हा सर्वसमावेशक आणि सर्व समाजाला समाहून घेवून न्याय देणारा पक्ष आहे. त्यामुळे नवनियुक्त पक्ष पदाधिकारी व नेते मंडळीनी पक्ष वाढणीसाठी जबाबदारीने पूर्ण शक्ती निशी काम करावे असे ही त्यांनी सांगितले. महिला प्रदेशाध्यक्ष डाॅ. उज्वलाताई हाके यांनी ही याप्रसंगी आपल्या भावना व्यक्त केल्या. या कार्यक्रमास जिल्ह्यातून भाजपा भटके विमुक्त आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Top