Views

*जिल्हा भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने पं.दिनदयाल उपाध्याय यांच्या पुण्यतिथी निमित्त समर्पण दिन साजरा*

उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

भारतीय जनता पार्टी उस्मानाबाद जिल्हा यांच्या वतीने भाजपा कार्यालय प्रतिष्ठाण भवन येथे भाजपा जनसंघाचे कै.पं.दिनदयाळ उपाध्याय यांच्या पुण्यतिथी निमित्त संमपर्ण दिन साजरा करण्यात आला. पं. दिनदयाळ यांच्या प्रतिमेचे पुजन भाजपाच्या भटके विमुक्त आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आ.नरेंद्र पवार (माजी आमदार कल्याण पुर्व) यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे, भाजपाचे बुध्दीजीवीचे संयोजक तथा माजी जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, भाजाचे सरचिटणीस अॅड.नितीन भोसले, प्रदिप शिदे, सिताराम वनवे, डाॅ.उज्वलाताई हाके, अॅड.भाग्यश्री ढाकणे, अमोल गायकवाड, गणेश मुंडे, नामदेव नायकल, सुरज षेरकर, लक्ष्मण माने, सतिष कदम, आदी उपस्थित होते.
यांनी संमर्पण दिनाबाबत माहिती देवून पक्ष बांधणीसाठी तसेच पक्षाला मजबूत करण्यासाठी भाजपाच्या प्रदेश पदाधिकारी, जिल्हा पदाधिकारी, मोर्चा, आघाडी, पदाधिकारी, तालुका पदाधिकारी, लोक प्रतिनिधी, कार्यकर्ते, हिंतचिंतक यांनी स्थानिक स्तरावर भाजपा जिल्हा करिता यथायोग्य निधी दयावा, असे आवाहन केले. संमर्पण निधी हा चेक स्वरूपात भारतीय जनता पार्टी उस्मानाबाद या नावाने घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.
 
Top