Views
*जहागिरदारवाडी तांड्याला - माजी आ.नरेंद्र पवार यांची भेट*

उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

भाजपाचे माजी आमदार तथा भाजपाचे भटक्या विमुक्त आघाडीचे प्रदेशाध्यक्ष माजी आ.नरेंद्र पवार यांनी दि.11 फेब्रुवारी 2021 रोजी उस्मानाबाद तालुक्यातील जहागिरदारवाडी तांडा येथे वस्तीभेट अंतर्गत भेट दिली. या प्रसंगी भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे, भाजपा भटके विमुक्त आघाडीचे सिताराम वनवे, महिला प्रदेशाध्यक्षा डाॅ.उज्वलाताई हाके, युवती प्रदेशाध्यक्षा अॅड.भाग्यश्री ढाकणे, युवा प्रदेशाध्यक्ष अमोल गायकवाड, भाजपाच्या भटके विमुक्त आघाडीचे जिल्हाध्यक्ष सिताराम वनवे, मनोज रणखांब, उपस्थित होते. सध्या नरेंद्र पवार हे महाराश्ट्राच्या दौ-यावर असून या दौ-या अंतर्गत ते भटके विमुक्तांच्या वाडी, वस्ती, तांडयावर भेट देवून त्या ठिकाणी समाजाच्या अडी अडचणी समजून घेवून त्यांच्याशी संवाद साधत आहेत. याच उपक्रमांतर्गत त्यांनी जहागिरदार वाडी तांडा येथे भेट दिली, मंदिरात उपस्थित असलेल्या बंजारा समाजातील नागरीक बंधू भगिनीशी विविध विशयांवर संवाद केला व त्यांच्या समस्या येणा-या काळात स्थानिक आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या माध्यमातून सोडविण्याबाबत आश्वस्त
 केले. जहागिरदारवाडी तांडा येथील उपस्थित ग्रामस्थांनी नरेंद्र पवार, भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे, प्रमुख पाहुण्यांचा हार, शाल, पुश्पगुच्छ देवून सत्कार केला.
याप्रसंगी पृथ्वीराज चव्हाण, प्रभाकर चव्हाण, सतिश राठोड, विठठल राठोड, ज्ञानदेव राठोड, तुकाराम चव्हाण, बाबुराव चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य विमलताई राठोड, बुराबाई चव्हाण, दत्ता आढाव, राजीव राठोड, आदी उपस्थित होते.
 
Top