Views



*शांतीदुत परिवाराच्या महीला आघाडी जिल्हाअध्यपदी सौ. शकुंतला मोरे*

उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

शांतीदुत परिवाराच्या महीला आघाडी उस्मानाबादच्या जिल्हाध्यक्षपदी उमरगा येथील सामाजीक कार्यकर्त्या सौ. शकुंतला मोरे यांची निवड करण्यात आली आहे.
शांतीदुत परिवार ही एक सामाजीक संघटना असुन यामाध्यमातुन बेरोजगारांना प्रशिक्षण , वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन,रक्तदान, गरजुंना कपडे वाटप, मास्क व हेल्मेट वाटप आदी उपक्रम राबविले जातात. ही संस्था भारतातील अनेक राज्यात व विदेशातही कार्यरत आहे. शांतीदुत
परिवाराच्या संस्थापक अध्यक्षा सौ. विद्या जाधव यांनी शनिवारी दि.6 फेब्रुवारी रोजी पत्राद्वारे ही निवड केली आहे. महाराष्ट्र राज्याचे माजी विशेष पोलिस महानिरीक्षक विठ्ठलराव जाधव यांच्या हस्ते पत्र देऊन ही निवड जाहीर केली. उमरगा शहरात गेल्या अनेक वर्षापासुन सौ. मोरे यांनी शैक्षणीक व सामाजीक क्षेत्रात उत्कृष्ठ कार्य करीत आहेत. त्यांनी आजपर्यंत अनेक गरीब व निराधार मुलांना दत्तक घेऊन त्यांचे शिक्षण पुर्ण केले आहे. त्यांना यापुर्वी थायलॅड व माॅरीषेशचा ग्लोबल अँवार्ड, अहील्यादेवी होळकर गौरव पुरस्कार, मराठवाडा भुषण व शांतीदुतचा समाजरत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे.
त्यांच्या या कार्याची दखल घेऊन ही निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल महाराष्ट्र राज्याचे माजी विशेष पोलिस महानिरीक्षक विठ्ठलराव जाधव, शांतीदुत परिवाराच्या संस्थापक अध्यक्षा सौ.विद्या जाधव, उपाध्यक्षा सुप्रिया बडवे यांच्यासह तालुक्यातुन अनेकांनी अभिनंदन केले आहे.
 
Top