*रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठानच्या उस्मानाबाद जिल्हा समन्वयक पदी राजमाने तर प्रवक्ते पदी जळकोटे यांची नियुक्ती*
उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)
-रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठानच्या उस्मानाबाद जिल्हा समन्वयक पदी राजमाने तर प्रवक्ते पदी जळकोटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या संपूर्ण महाराष्ट्रात रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य ही सेवाभावी संस्था महाराष्ट्र भरातील १६ जिल्ह्यामध्ये काम करत आहे. सामाजिक क्षेत्राबरोबरच, शैक्षणिक, क्षेत्रात ही या संस्थेचे योगदान मोठे असते. शिवकार्य आणि समाजकार्य हे घराघरात पोहोचले जावे यासाठी ही संस्था काम करत आहे. प्रतिष्ठान च्या अध्यक्षा तथा अभिनेत्री अश्विनी महांगडे, उपाध्यक्ष - निलेश जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे कार्य सध्या सर्वत्र सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान टीम उस्मानाबाद यांच्या वतीने जिल्ह्यातील अनेक सामाजिक उपक्रम राबवले गेलं आहेत. याच पार्श्वभूमीवर रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान तर्फे उस्मानाबाद जिल्ह्यातील समन्वयक पदासाठी राज्य समन्वयक प्रमुख जितेंद्र तेलवणे यांच्या मार्गदर्शनाखाली तुळजापूर तालुक्यातील वडगाव (देव) चे प्रसाद राजमाने यांची जिल्हा समन्वयक तर महाराष्ट्र राज्य प्रवक्ते प्रमोद कारकर आणि शीतल लाडके यांच्या मार्गदर्शनाखाली किलज गावचे राम जळकोटे यांची जिल्हा प्रवक्ते पदासाठी निवड करण्यात आली आहे. नियुक्ती झाल्याबद्दल उपस्थित पदाधिकार्यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्याचे अभिनंदन करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या निवडीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.