Views
*जिल्हा स्तरीय उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार पत्रकार नीलकंठ कांबळे यांना मिळाल्याबद्दल लोहारा तालुका भाजपा यांच्या वतीने सत्कार*

उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

जिल्हा स्तरीय उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार लोहारा शहरातील पत्रकार नीलकंठ कांबळे यांना मिळाल्याबद्दल लोहारा तालुका भाजपा यांच्या वतीने तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील यांच्या वतीने शाल, पुष्पहार घालुन सत्कार करण्यात आला. उमरगा पत्रकार संघाच्या वतीने दरवर्षी उत्कृष्ट पुरस्कार देऊन गौरविण्यात येतो. यंदाचा जिल्हास्तरीय 
उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार लोहारा येथील पत्रकार निळकंठ कांबळे यांना देण्यात आला आहे. कांबळे यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल लोहारा तालुका भाजपाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, जिल्हा चिटणीस विक्रांत संगशेट्टी, भाजपा मिडिया तालुकाध्यक्ष इकबाल मुल्ला, ग्रामपंचायत सदस्य दादा काळपप्पा दस्तापुर, बालासिंग बायस, अदि, उपस्थित होते.
 
Top