Views

*आष्टा कासार येथे राम मंदिर निर्माणासाठी ग्रामस्थांनी रामदिंडी काढून निधिसंकलन केले*

उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

अयोध्या येथे निर्माण होत असलेल्या भव्य अशा राम मंदिराच्या निर्माण कार्यासाठी संपूर्ण भारतभर श्रीराम मंदिर निधी समर्पण अभियान चालू आहे, त्याच अनुषंगाने लोहारा तालुक्यातील आष्टा कासार येथे श्री राम मंदिर निर्माणासाठी ग्रामस्थांनी रामदिंडी काढून निधिसंकलन केले. यावेळी गावातील दत्त मंदिराजवळ श्री प्रभू रामचंद्राच्या प्रतिमेचे पुजन गावातील भजनी मंडळ व तालुका अभियान पालक दत्तात्रय दंडगुले यांच्या हस्ते पूजन करून रथामधून भजन करत संपूर्ण गावातून फेरी करण्यात आली. यावेळी ध्वनिक्षेपकावरून गावातील सर्व रामभक्तांना या पवित्र कार्यात आपण तन, मन, धन या रुपाने समर्पण करण्याचे अवाहन करण्यात आले. घराघरातून बालक, पुरुष, महिला येऊन श्रीफळ वाढवत होते. राम रथाचे पूजन करून भजनी मंडळींना औक्षण करत होते. अशाप्रकारे रामफेरीचे भव्य स्वागत करत होते. यावेळी नागरीक निधी स्वतःहून जमा करत होते. याप्रसंगी गावातील मुकेश मुळे, ज्ञानेश्वर चव्हाण, प्रशांत सोलापुरे, शंकर सोमवंशी, सचिन दासिमे, अरविंद पोतदार, महादेव आळंगे, प्रकाश औटी, शेषेराव पाटील, नागेश तडकले, राजेंद्र चौधरी, अनिल सोमवंशी, धोंडिराम पाटील, शेखर स्वामी, गुंडू पाटील, आरुण पाटील, सुरेश गिरी, गहिणू चौधरी, सखाराम देडे, रामकृष्ण शिंदे, वैजिनाथ दासमे, अप्पू ठाकरे, दत्ता तडकले, सौदागर हिंगमीरे, व्यंकट चौधरी, आप्पा बलसुरे, आदि, उपस्थित होते. रामफेरीचा शेवट श्री दत्त मंदिरात येऊन आरती करून झाला. यावेळी मंडल प्रमुख प्रशांत सोलापूरे सर यांनी सर्व रामभक्तांचे आभार मानले.
 
Top