Views*उस्मानाबाद येथे शिक्षक पतसंस्थेत शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा*

उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

उस्मानाबाद तालुका शिक्षक सहकारी पतसंस्थेत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. प्रारंभी छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन रणजीत कदम, व्हाईस चेअरमन तय्यब अली शहा, माजी चेअरमन राजकुमार माने, प्रशांत माने, संस्थेचे मार्गदर्शक विकास मगर, लगदिवे आप्पा, ज्ञानेश्वर केवलराम, राजेश तनमोर, खुदबुद्दीन शेख, प्रशांत पाटील, धनंजय सूर्यवंशी, सरडे, कर्मचारी बाळासाहेब मगर, राजाभाऊ सूर्यवंशी, यांच्यासह शिक्षक सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Top