Views


*कानेगांव येथे स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती निमित्त पालखी मिरवणूक काढुन शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी*

उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

लोहारा तालुक्यातील कानेगांव येथील तरुण मित्र मंडळाच्या वतीने डिजे मुक्त व अनावश्यक खर्च टाळुन स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची ३९१ वी जयंती निमित्त पालखी मिरवणूक काढुन शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कानेगांव येथे दरवर्षी शिवजयंती साजरी करण्यात येते. यावर्षी प्रथमच पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. पालखी मध्ये छत्रपती शिवाजी महाराजाची मुर्ती ठेऊन पालखीचे वारुळ, हालक्या व टाळ मृदंगांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. यात काही बालकांनी शिवाजी महाराजांची वेशभुषा केली होती. पालखी चा समारोप गावातील गोलाई येथे करण्यात आला‌. या वेळी बाळशिवाजी राजेंच्या वेशभुषेत स्वराज चंदनशिवे, शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष सुमीत कदम, विकास कदम, विकि लोभे, उमेश लोभे, पंकज कदम, दयानंद माटे, सुधीर चंदनशिवे, नागनाथ कदम, सचिन क्षिरसागर.बालाजी कदम, यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
 
Top