Views




*शिवनेरी ऑटो रिक्षा संघटनेच्या वतीने शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा*
 
उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

उस्मानाबाद शहरातील सांजा रोड येथे शिवनेरी ऑटो रिक्षा संघटनेच्या वतीने शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्याचे पूजन जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जय भवानी जय शिवराय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, हर हर महादेव अशा गगनभेदी घोषणांनी सांजा रोड व छत्रपती शिवाजी महाराज चौक दुमदुमून गेला होता. या कार्यक्रमास सांजा गावचे सरपंच संताजी पवार, उपसरपंच सतीश सूर्यवंशी, पं.स.सदस्य नायकल, जिल्हा परिषद लिपिक वर्गीय कर्मचारी पतसंस्थेचे चेअरमन सुहास कदम, उस्मानाबाद तालुका शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन रणजीत कदम, शिवराज्याभिषेक समितीचे विष्णू इंगळे, काकडे, शिवनेरी ऑटो रिक्षा संघटनेचे मार्गदर्शक देवा काकडे, अध्यक्ष अनिल सूर्यवंशी, उपाध्यक्ष सत्यविजय मोहिते, सचिव बालाजी झोंबाडे, कोषाध्यक्ष बाळू सावंत, विशाल, सूर्यवंशी गफुर शेख, श्रीकांत कदम, दत्ता कोळी, पिंटू सूर्यवंशी, प्रदीप सूर्यवंशी, संभाजी सूर्यवंशी, अलीम शेख, मंजूर शेख, समाधान चोपडे, यांच्यासह शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Top