Views

*लोहारा तालुक्यातील नुतन सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्यांचा आ.ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते सत्कार*

उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

लोहारा तालुका शिवसेना, युवासेना यांच्यावतीने लोहारा तालुक्यातील नुतन सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्यांचा शहरात दि.13 फेब्रुवारी 2021 रोजी आ. ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख बाबुराव शहापुरे (उमरगा), माजी शिवसेना तालुका प्रमुख ज्ञानेश्वर सुर्यवंशी ( लोहारा), युवासेना तालुका प्रमुख अमोल बिराजदार (लोहारा), नुतन सरपंच तथा युवासेना उपजिल्हा प्रमुख नामदेव लोभे (कानेगाव), सरपंच सागर पाटिल (कास्ती खुर्द), सरपंच सचिन रसाळ (लोहारा खु), सरपंच श्रीशैल्य ओवांडे (सय्यद हिप्परगा), उपसरपंच शकिल तांबोळी (कास्ती), उपनगराध्यक्ष प्रताप घोडके (लोहारा), शिवसेना गटनेते अभिमान खराडे (लोहारा न.पं), नगरसेवक शाम नारायणकर, शिवसेना शहर प्रमुख सलीम शेख (लोहारा), अमिन सुंबेकर, युवा सेना शहर प्रमुख श्रीकांत भरारे, दत्ता मोरे, भरत सुतार, नितीन जाधव, यांच्यासह लोहारा तालुक्याती नुतन सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शिवसैनिक, युवासैनिक मोठ्या संखेने उपस्थित होते.
 
Top