Views





*सरकार आणि विमा कंपनीच्या विरोधात जिल्हा भाजपच्या वतीने पीक विम्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनास सुरुवात, या आंदोलनात दुसऱ्या दिवशी लोहारा शहरातील व तालुक्यातील भाजपाच्या पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला*

उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

 जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना पिक विमा नुकसान भरपाई तात्काळ मिळावी, या मागणीसाठी जिल्हा भाजपाच्यावतीने भाजपा प्रदेश सरचिटणीस आ.सुजितसिंह ठाकूर व आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली सरकार व पीक विमा कंपनीच्या विरोधात उस्मानाबाद येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दि.15 फेब्रुवारी 2021 पासून धरणे आंदोलनास सुरुवात केली आहे. या चालू असलेल्या आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी दि.16 फेब्रुवारी 2021 रोजी या आंदोलनात लोहारा शहरातील व तालुक्यातील भाजपाच्या असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे, जिल्हा सरचिटणीस अॅड.नितीन भोसले, जिल्हा सरचिटणीस प्रदीप शिंदे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंहा निंबाळकर, जिल्हा उपाध्यक्ष इंद्रजित देवकते, जिल्हा उपाध्यक्ष राहुल पाटील सास्तूरकर, लोहारा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, उस्मानाबाद तालुकाध्यक्ष राजाभाऊ पाटील, जिल्हा चिटणीस विक्रांत संगशेट्टी, गुलचंद व्यवहारे, दिव्यांग जिल्हाध्यक्ष समाधान मते, पं.स. सदस्य वामन डावरे, दादासाहेब काळप्पा, भाजपा मिडिया तालुकाध्यक्ष इकबाल मुल्ला, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष बालाजी चव्हाण, शुभम साठे, ओबीसी तालुकाध्यक्ष दगडु तिगाडे, प्रमोद पोतदार, कमलाकर सिरसाट, सुभाष गिरी, शिरीष मुसांडे, दिलीप पवार, रवी कदम, अरुण कदम, विजय नरसाळे, सचिन सूर्यवंशी, यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी, मोठया संख्येने उपस्थित होते.
 
Top