Views
*पीक विम्या साठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजपाच्या वतीने साखळी धरणे आंदोलन*

उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची भरपाई देण्या बाबत होत असलेल्या चालढकलीचा तीव्र निषेध करत राज्य सरकारने पीक विमा कंपनीला हक्काची नुकसान भरपाई देण्यास भाग पाडावे, अथवा स्वत: द्यावी यासाठी दि. 15 फेब्रुवारी 2021 पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी धरणे आंदोलन करण्याचा निर्णय आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शेतकर्यांच्या बैठकीमध्ये घेण्यात आला होता. यानुसार भारतीय जनता पार्टी जिल्हा उस्मानाबाद यांच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर दि.15 फ्रेबुवारी ते दि.22 फ्रेबुवारी 2021 पर्यंत प्रदेश सरचिटणीस आ.सुजितसिंह ठाकूर व आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली पिक विमा मिळणेबाबत उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांची साखळी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीमुळे राज्य सरकारने अत्यंल्प अशी मदत केलेली आहे. मंत्री महोदयांच्या सरसकट मदत देण्याच्या घोषणेमुळे अनेक शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईची ऑनलाईन तक्रार केलेली नाही. व बऱ्याच शेतकऱ्यांकडे अन्ड्राईड मोबाईल नसल्यामुळे ते नुकसान भरपाईची तक्रार नोंदवू शकले नाहीत. याबाबत वेळोवेळी शासनास कळवूनही याची कसलीही दखल सरकारने घेतलेली नाही. त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकज्यांवर अन्याय होत आहे. त्यामुळे या अन्याया विरुध्द धरणे साखळी आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाच्या पुर्व तयारीसाठी दि.13 फेब्रुवारी 2021 रोजी भाजपा कार्यालय, प्रतिष्ठान भवन येथे बौठक बोलवण्यात आली होती. याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी बौठकीस मार्गदर्शन केले. यावेळी बुध्दीजिवी प्रकोष्ट संयोजक तथा माजी जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, प्र.का.स.अॅड.अनिल काळे, अॅड.खंडेराव चौरे, अविनाश कोळी, माजी जि.प.अध्यक्ष नेताजी पाटील, जिल्हा सरचिटणीस अॅड.नितीन भोसले, भाजयुमो जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर, माजी नगराध्यक्ष सुनिल काकडे, तालुकाध्यक्ष राजाभाऊ पाटील, शहराध्यक्ष राहुल काकडे, लोहारा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, रामदास कोळगे, उपनगराध्यक्ष अभय इंगळे, आनंद कंदले, सुशांत भुमकर, दाजी पवार, सुजित साळुंके, प्रविण पाठक, विनोद निंबाळकर, सुरज शेरकर, यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी बौठकीस उपस्थित होते. तरी या आंदोलनात जिल्ह्यातील शेतकज्यांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी केले आहे.
 
Top