*सहाय्यक पोलीस निरिक्षक लांडगेंच्या "वज्रमूठ" काव्यसंग्राहाचे प्रकाशन*
उस्मानाबाद:-(समीर मुल्ला)
उस्मानाबाद तालुक्यातील कसबे येथील सुपुत्र महेश बाळासाहेब लांडगे सहायक पोलीस निरीक्षक नांदेड यांचे 'सनय प्रकाशन नारायणगाव ,पुणे प्रकाशित ' वज्र्यमूठ' या काव्य संग्रहाचा शिवजयंती निमित्त प्रकाशन सोहळा जगदंबा फंक्शन हॉल येथे दि १९ रोजी सायंकाळी सहा वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन झाले
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खलील शेख यांनी केले तर प्रस्तावांना अर्जुन राठोड सर यांनी केली . प्रकाशन सोहळ्यानिमित्त लांडगे यांचे वडील बाळासाहेब व माता मंगल बाळासाहेब लांडगे यांचा टीचर्स ग्रुपच्या वतीने सत्कार करून ऋण व्यक्त करण्यात आले
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रा गवळी सर मुख्याध्यापक जयहिंद विद्यालय तडवळे हे होते तसेच सोमनाथ वैद्य माजी शिक्षण अधिकारी पुणे, भारत सातपुते जेष्ठ साहित्यीक भादा,विलास पडवळ प्रा तेरणानगर ,अर्जुन राठोड प्रा गेवराई यांच्या शुभ हस्ते तर प्रमुख उपस्थिती एस पि शुगर चे चेअरमन सुरेश पाटील ,खुळे सर शिक्षण विस्तार अधिकारी परंडा , गावचे सरपंच मन्मथ आवटे ,विजयसिंह जमाले ,तुळशीदास जमाले ,सुनीता पडवळ प्रा तेरणानगर ,संतोष देशपांडे ,अजय जानराव,रेहमान सय्यद यांच्या उपस्थितीत महेश लांडगे लिखित वज्र्यमूठ या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमात मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करत महेश लांडगे यांना शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन बबन गावकरे यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ,प्रशांत लांडगे सर ,राजभाऊ लोंढे सर , टीचर्स ग्रुप व क्लासमेट ग्रुप यांनी परिश्रम घेतले , या कार्यक्रमाला गावांतील व पर जिल्ह्यातील शेकडो मित्र परिवार उपस्थित होते