Views*भाजपाचे प्रदेश सरचिटणीस आ.सुजितसिंह ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त लोहारा तालुका भाजपाच्या वतीने गरीब कूटुंबाना धान्य किट व मास्क वाटप*

उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

भाजपाचे प्रदेश सरचिटणीस आ.सुजितसिंह ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त लोहारा तालुका भाजपाच्या वतीने सामाजिक भावना जपत लोहारा शहरातील व तालुक्यातील गरीब, गरजु, कुटुंबाना व ऊसतोड कामगारांना धान्य किट व मास्क वाटप भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, तालुका सरचिटणीस नेताजी शिंदे, भाजपा मिडिया तालुकाध्यक्ष इकबाल मुल्ला, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष बालाजी चव्हाण, कल्याण ढगे, दादा मुल्ला, सिद्धना नरुणे, यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते, उपस्थित होते.
 
Top