Views






*कोरोनाचा प्रार्दुभाव व या पार्श्वभूमीवर प्रशासनाने केलेल्या आवाहनामुळे सदरील धरणे आंदोलन आजपासून स्थगित*

उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचा अर्ज करू न शकलेल्या लाखो शेतकर्‍यांना पिक विमा मिळावा या मागणीसाठी भाजपा प्रदेश सरचिटणीस आ.सुजितसिंह ठाकूर व माजी राज्यमंत्री आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दि.15 फेब्रुवारी 2021 पासून उस्मानाबााद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू होते. या आंदोलांनामध्ये जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शेतक-यांना न्याय मिळेपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवण्यात येणार होते, परंतू जिल्हयासह राज्यभरात वाढत असलेला कोरोनाचा प्रार्दुभाव व या पार्श्वभूमीवर प्रशासनाने केलेल्या आवाहनामुळे सदरील धरणे आंदोलन आजपासून स्थगित करण्यात आले आहे. परंतू हे करत असताना भारतीय जनता पार्टी जिल्हयाचे पालकमंत्री शंकरराव गडाख यांना इशारा देत आहे की, जिल्हयाचे पालक म्हणून आपण या गंभीर व संवेदनशील विषया बाबत तातडीने सर्व संबंधितांची जिल्हयात बैठक घ्यावी व शेतक-यांची हि कैफियत मुख्यमत्र्यांपर्यंत पोहचवून मंत्रीमंडळाच्या बैठकीत चर्चा घडवून न्याय करावा, अन्यथा सरकारला शेतकर्‍यांच्या तीव्र आक्रोशाला सामोरे जावे लागेल. आंदोलना दरम्यान महाविकास आघाडी सरकार मधील घटक पक्षांचे स्थानिक पदाधिकारी व लोकप्रतिनिधी या विषयाबाबत गंभीर नसून पीक विम्याबाबत काहीच बोलत नाहीत व कुठलीच कृती करत नाहीत, अशी भावना अनेक शेतकर्‍यांनी व्यक्त केली. त्यामुळे शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी यासाठी शेतक-यांसह या पक्षांच्या जिल्हाध्यक्षांना भेटण्याचा तसेच त्यांनी पीक विम्यासाठी केलेल्या प्रयत्नाबाबत जाब विचारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही प्रक्रिया पुढील काही दिवसात केली जाणार आहे. किमान यामुळे तरी सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारी सरकार मधील वरिष्ठांशी बोलून शेतकर्‍यांच्या भावना व विषयाचे गांभीर्य समजावून सांगतील. छत्रपती शिवाजी महाराजांना बळीराजा प्रती असलेल्या आस्थेमुळे रयतेचे राजे संबोधण्यात येते. महाराजांच्या नावाने राजकारण करत असलेल्या शिवसेनेचे सरकार असूनही बळीराजाला न्याय मिळत नाही, ही मोठी शोकांतिका आहे. परंतु भारतीय जनता पार्टी शेतकर्‍यांना असे वार्‍यावर सोडणार नाही. शेतकर्यांना न्याय मिळेपर्यंत हा लढा सुरूच राहणार आहे. धरणे आंदोलनाच्या आजच्या सहाव्या दिवशी भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे, सरचिटणीस अॅड. नितीन भोसले, जिल्हा सरचिटणीस आदम शेख, उस्मानाबााद तालुकाध्यक्ष राजाभाऊ पाटील, भुम तालुकाध्यक्ष महादेव वडेकर, भटक्या विमुक्त सेल जिल्हाध्यक्ष सिताराम वनवे, भाजयुमो जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर, विनोद गपाट, माजी नगराध्यक्ष सुनिल काकडे, निशिकांत पाटील, दत्ता राजमाने, अमोल पाटील, प्रविण सलगर, संतोश कस्पटे, किषोर पवार, रामेश्वर शेटे, संतोष सुपेकर, व्यंकट बंडगर, विजय सरडे, प्रविण चैगुले, नवनाथ मुळे, यांच्यासह पदाधिकारी व शेतकरी बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.
 
Top