Views

*हजारोंच्या संख्येने शोकाकुल वातावरणात कै.मातोश्री गंगाबाई माधवराव पाटील यांच्यावरती विधीवत अंत्यसंस्कार*                 

उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

मुरुम येथील महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री बसवराज पाटील, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष बापूराव पाटील यांच्या मातोश्री व जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते शरणजी पाटील यांच्या आजी कै.गंगाबाई माधवराव पाटील यांचे काल दुपारी गुरुवारी दि.4 फेब्रुवारी रोजी सोलापूर येथील खाजगी रुग्णालयात अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले होते. त्यांच्यावरती शुक्रवारी दि.5 फेब्रुवारी रोजी कै.माधवराव पाटील उर्फ काका यांच्या समाधीस्थळी भावपूर्ण वातावरणात दुपारी तीन वाजता श्रीशैलपीठाचे डॉ.श्री श्री श्री 1008 चन्नासिध्दाराम उमापंडीत आराध्य शिवाचार्य महास्वामीजींच्या व विविध पिठाच्या मठाधिपती यांच्या हस्ते विधीवत पध्दतीने अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सोलापूर मठाचे मठाधिपती बसवराज शास्त्री, होटगीचे मल्लीकार्जुन शिवाचार्य, मैंदर्गीचे निळकंठ शिवाचार्य, मंद्रुपचे रेणुका शिवाचार्य, नागणसुरचे श्रीकंठ शिवाचार्य, नंदगावचे राजशेखर महास्वामी, जेवळीचे गंगाधर स्वामी, नारळी मंठाचे जय मल्लीकार्जुन यांच्यासह या अंत्यविधीसाठी कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगना, गुजरात, महाराष्ट्रातील विविध जिल्हयातून विविध स्तरातील जनसागर पाटील परिवाराच्या दुःखात सहभागी झाला होता. याप्रसंगी जगदगुरु शिवाचार्य महास्वामीजी यांनी आशीर्वचनपर बोलताना म्हणाले की, कै.मातोश्री गंगाबाई माधवराव पाटील यांनी जे संस्कार या परिवाराला दिले त्यामुळे पाटील साहेब राजकीय व सामाजिक क्षेत्रात उच्च पदावर पोहचले. कै. मातोश्री गंगाबाई यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो ! अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून हजारो जनसागराच्या उपस्थितीत दोन मिनिटे स्तब्ध राहून भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली. यावेळी शोकसभेला संबोधित करताना पाटील परिवाराच्या दुःखात जनसागर सहभागी झाला असून त्यांना या दुःखातून सावरण्याची ईश्वर त्यांना शक्ती देवो ! अशी प्रार्थना केली. यावेळी गोरगरीब महिलांना अश्रू अणावर झाले. अनेकांचा कंठ दाटून आला. याप्रसंगी माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, माजी मंत्री सिध्दाराम म्हेत्रे, माजी मंत्री विजयकुमार देशमुख, आमदार अभिमन्यु पवार, आ.ज्ञानराज चौगुले, आ.सचिन कल्याणशेट्टी, आ.विक्रम काळे, शैलेश पाटील चाकूरकर, माजी आमदार वैजीनाथ शिंदे, ज्ञानेश्वर पाटील, रवी पाटील, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अशोकराव पाटील निलंगेकर, धर्मराज काडादी, सचिन गुदगे, संगमेश कल्याणशेट्टी, सिद्धाराम चाकोते, धीरज पाटील, किरण रविंद्र गायकवाड, एस.आर.देशमुख, नारायण लोखंडे, सुनिल चव्हाण, संजय दुधगावकर, बाबा पाटील, औसाचे नगराध्यक्ष अफसर शेख, रामदास चव्हाण, शेषेराव पाटील, अँड.पत्रिके, विलास मिलगिरे, माजी नगराध्यक्ष संगमेश्वर ठेसे, सुनिल मिटकरी, बसवराज धाराशिवे, प्रा.बी. व्ही.मोतीपवळे, व्यंकट बेंद्रे, हलप्पा कोकणे, दिपक आलुरे, गोपाळराव पाटील, एम.ए.सुलतान, अभय चालुक्य, दिपक जवळगे, बजरंग जाधव, बाबुराव शहापूरे, सुनिल माने, शहाजी पवार, नगराध्यक्षा प्रेमलता टोपगे, अनिता अंबर आदींसह सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सहकार विविध क्षेत्रातील संस्था, संघटनांचे पदाधिकारी, मान्यवर उपस्थित होते.
 
Top