Views
*वीज तोडणी व वाढीव वीजबिल सक्तीच्या वसुली विरोधात राज्य सरकारचा निषेध करून जिल्हा भाजपा यांच्या वतीने टाळा ठोकुन आंदोलन....*

उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

कोरोनाच्या काळात मीटर रिडींग न घेताच अंदाजे भरमसाठ विजबिले देण्यात आली, ही विजबिले वाढीव असल्याने एकप्रकारे भ्रष्टाचाराचे उदाहरण होते, यावर मोठी टिका झाल्याने ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी विजबिले कमी करण्याची घोषणा केली परंतु माफी देण्याचे बाजूला ठेऊन ही वाढीव वीजबिल सक्तीने वसूल करा, अन्यथा वीज जोडणी तोडा असे आदेशच राज्य सरकारने महावितरणला दिले आहेत.... याविरुद्ध जनतेचा आक्रोश मांडण्यासाठी उस्मानाबाद जिल्हा भाजपने महावितरण कार्यालयासमोर तीव्र निदर्शने केली. कोरोनाच्या काळातील वाढीव विजबिले भरा अन्यथा वीज जोडणी तोडण्यात येईल असा जाचक निर्णय राज्यातील शिवसेना काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारने घेतला आहे, कोरोनाच्या काळात आलेली विजबिले ही मीटर रिडींग पेक्षा जास्त असल्याने ती माफ करण्यात येतील अशी भूमिका ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी घेतली होती पण ही वाढीव विजबिले माफ करणे दूरच उलट राज्य सरकारने सक्तीने वीजबिल वसुलीचा तगादा लावला आहे...वाढीव विजबिलासंदर्भात ठाकरे सरकारच्या मंत्र्यांनी दिलेली आश्वासने त्यांनी स्वतःच मोडीत काढली आहेत‌. या जुलमी कारभाराची पोलखोल करत भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रभरात टाळा ठोको आंदोलन केले याचाच भाग म्हणून उस्मानाबाद जिल्ह्यात भाजपा प्रदेश सरचिटणीस आ.सुजितसिंह ठाकुर व आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या नेतृत्वात महावितरण कार्यालयास टाळे ठोको आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी जिल्ह्यात वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा, सतत जळत असलेले ट्रॉन्सफार्मर, महावितरण कडुन ट्रॉन्सफार्मर दुरुस्तीसाठी शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचा प्रकार याबाबत जिल्हा अधीक्षक अभियंता महावितरण यांना विविध मागण्या करण्यात आल्या. या आंदोलनात भाजपा कार्यकर्त्यांसह त्रस्त ग्राहकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर, जिल्हा सरचिटणीस अॅड.नितीन भोसले, किसान मोर्चा मराठवाडा संपर्क प्रमुख रामदास कोळगे, प्र.का.सदस्य अॅड. खंडेराव चौरे, सोशलमीडिया प्रदेश कंटेंट टीम प्रमुख पांडुरंग (अण्णा) पवार, युवा जिल्हा उपाध्यक्ष इंद्रजित देवकते, खरेदी विक्री संघ चेअरमन अनंत देशमुख, बाजार समिती सभापती दत्ता देशमुख, माजी नगराध्यक्ष सुनील काकडे, तालुकाध्यक्ष राजाभाऊ पाटिल, एस‌.सी. मोर्चा अध्यक्ष प्रवीण सिरसाट, माजी सभापती ओमप्रकाश मगर, माजी पं.स.सभापती नानासाहेब कदम, माजी पं स सभापती संजय लोखंडे, प्र.का.स.सोशल मीडिया पांडुरंग पवार, माजी तालुकाध्यक्ष गजानन नलावडे, विनायक कुलकर्णी, देवा नायकल, शहराध्यक्ष, राहुल काकडे, उपनगराध्यक्ष अभय इंगळे,नगरसेवक दाजीप्पा पवार, शिवाजीराव पंगूडवाले, बापू पवार, बालाजी कोरे, सुधीर पाटील, प्रवीण पाठक, संदीप इंगळे, विनोद निंबाळकर, सचिन लोंढे, गिरीश पानसरे, सूरज शेरकर, कुलदीप भोसले, बंटी मुंडे, प्रसाद मुंडे, पुष्पकांत माळाळे, मेसा जानराव, सुजित साळुंके, गणेश मोरे, गणेश इंगळगी, राज निकम, मनोजसिंह ठाकूर, मुकेश नायगावकर, दादा गुंड,अक्षय भालेराव, अमोल राजे, अजित खापरे, शीतल बेदमूथा, ओंकार वायकर, आशिष कोरे, दिनेश लोहार, आकाश शिदूळे, यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व युवा मोर्चा कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
 
Top