*भारतीय जनता पार्टी उमरगा यांच्या वतीने भाजपाचे मराठवाडा संघटनमंत्री संजय कौडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकर्त्यांची पक्ष विस्तार संदर्भात बैठक संपन्न*
उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)
भारतीय जनता पार्टी उमरगा यांच्या भाजपाचे मराठवाडा संघटनमंत्री संजय कौडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील शासकिय विश्रामगृहात दि.18 फेब्रुवारी 2021 रोजी पक्ष विस्तार संदर्भात तालुक्यातील कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी मार्गदर्शन करताना कौडगे म्हणाले कि, उमरगा तालुक्यातील सर्व बुथची माहिती घेणे, रचना करणे आणि त्यावर वन बुथ थर्टी युथ अशी रचना करणे आणि येत्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुका महविकास आघाडीच्या विरोधात पूर्ण ताकदीने लढण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने लढायच आहे. यावेळी नूतन भाजपा तालुका कार्यकारणीचा व निवडून आलेल्या सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार मान्यवरांचा हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे, हर्षवर्धन चालुक्य पाटील, जिल्हा सरचिटणीस प्रदीप शिंदे, जिल्हा सरचिटणीस माधव पवार, भाजपा तालुकाध्यक्ष कैलास शिंदे, दिलीपसिंह गौतम, सिद्धेश्वर माने, सुनिल कुलकर्णी, राजु मिनियार, जि.प.समाजकल्याण सभापती दिग्वजय शिंदे, अनिल बिराजदार, अभिषेक पवार, गुलाब डोंगरे, विठ्ठल चिकुंद्रे, पंकज मोरे, गणेश डोंगरे, यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.