Views







*लोहारा शहरातील भारतमाता मंदिर येथे अखंड हरिनाम सप्ताहास सुरुवात*

उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

लोहारा शहरातील भारतमाता मंदिर येथे सालाबादप्रमाणे याही वर्षी श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यास दि‌.31 जानेवारी 2021 पासून मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पुजन, टाळ, मृदंग, विना, पकवाजनचे पुजन करुन सुरुवात करण्यात आली. या सप्ताहामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये काकडा, नामजप, ज्ञानेश्वरी पारायण, महिला भजन, गाथा भजन, प्रवचन, हरीपाठ, किर्तन, हरीजागर, अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. व तसेच अल्पोपहार व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. यावेळी प्रमुख म्हणून नगराध्यक्षा सौ. ज्योती दिपक मुळे, उपनगराध्यक्ष प्रताप घोडके, माजी पं.स. सदस्य चंद्रकांत पाटील, माजी सरपंच शंकर जटे, दत्तात्रय बिराजदार, व्यंकट घोडके, जिल्हा सहकार बोर्ड संचालक अविनाश माळी, विठ्ठल वचने पाटील,उमाकांत भरारे, हरी वाघे, दिपक मुळे, काशीनाथ स्वामी, युवक कॉंग्रेस शहराध्यक्ष हरी लोखंडे, नगरसेवक बाळासाहेब कोरे, शाम नारायणकर, बालाजी मक्तेदार, विजयकुमार ढगे, शंकर रणशुर, विद्यादर कोळी, अदि, उपस्थित होते. या सप्ताहात ह.भ.प.आदिनाथ गोरे महाराज लोहारा, संगमेश्वर बिराजदार वलांडी, स्वामी महाराज लातूर, धारवाडकर गुरुजी महाराज, तुकाराम हजारे महाराज, गुरुवर्य गहिनीनाथ महाराज औसेकर यांची किर्तन तर दि.6 फेब्रुवारी रोजी ह.भ.प.महेश महाराज माकणीकर यांच्या हस्ते काल्याचे किर्तनाने व भाविकांना महाप्रसाद वाटप करुन सप्ताहाची सांगता होणार आहे. यावेळी बलभिम माळी, कोंडप्पा मुळे, कांत माळी, मंगेश महाजन, शहाजी जाधव, अमोल माळी, नारायण वाघे, सुधाकर वचने, सुभाष पाटील, सुभाष माळी, यांच्यासह भाविक, ग्रामस्थ उपस्थित होते.
 
Top