Views
*पल्स पोलिओ मोहीम अंतर्गत लोहारा शहरात व तालुक्यात पोलिओ बुथची स्थापना करुन लहान बालकांना पोलिओ डोस पाजण्यात आले*

उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

लोहारा शहरात व तालुक्यात पल्स पोलिओ मोहीम अंतर्गत दि.31 जानेवारी 2021 रोजी लहान बालकांना पोलिओ डोस पाजण्यात आले. लोहारा तालुका ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने शहरातील ग्रामीण रुग्णालय, शिवाजी चौक, भारतमाता मंदिर, क्रं.8 अंगणवाडी, हनुमान मंदिर, या पाच ठिकाणी पोलिओ बुथची स्थापना करून लहान बालकांना पोलिओ डोस पाजण्यात आले. शहरातील शिवाजी चौका येथील पोलिओ डोस बुथचे शुभारंभ नगरसेवक श्रीनिवास माळी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ.गोविंद साठे, उपनगराध्यक्ष प्रताप घोडके, डॉ. राजेश्वर काळे, डॉ. राजु गायकवाड, डॉ. इरफान शेख, डॉ. कोमल मगर, अंगणवाडी कार्यकर्ती वंदना भगत, खंडु शिंदे, श्रीमती लोंढे, श्रीमती घोडके श्रीमती चांदणी मोरे, श्रीमती ज्योती पाटील अल्लाबक्ष बागवान, अमोल वाघमारे, आदि, उपस्थित होते. लोहारा तालुक्यातील अचलेर येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात पोलिओ डोस बुथचे शुभारंभ सरपंच प्रकाश लोखंडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संजय पाटील, अंबिका बनसगोळे, पांढरे, गुंजे, अंगणवाडी कार्यकर्ती रेखा राठोड, लक्ष्मी कांबळे, विमल आष्टगे, जीजा चव्हाण, राजश्री माशाळकर, अल्लम्मा दत्तरगे, पदमा कुलकर्णी, आदि, उपस्थित होत्या.
 
Top