Views


*सुंदर माझे कार्यालय अभियानात अंतर्गत लोहारा पंचायत समितीच्या वतीने स्वच्छता मोहिम राबवुन पं.स.कार्यालय व तहसील कार्यालयासमोरील परिसर स्वच्छ*

उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

सुंदर माझे कार्यालय अभियानात अंतर्गत लोहारा पंचायत समितीच्या वतीने दि.30 जानेवारी 2021 रोजी स्वच्छता मोहिम राबवुन पं.स.कार्यालय व तहसील कार्यालयासमोरील परिसर स्वच्छ करण्यात आले. 
या मोहिमेत पं.स.समितीचे गटविकास अधिकारी एस.ए.अकेले यांच्या नेतृत्वाखाली अधिकारी, कर्मचारी, ग्रामसेवक यांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन सर्व परिसर श्रमदान करुन स्वच्छ करून वृक्ष लागवड केली. यामुळे सर्व परिसर स्वच्छ झाला. या मोहिमेत गटविकास अधिकारी एस.ए.अकेले, सहाय्यक गटविकास अधिकारी संजय ढाकणे, सहाय्यक प्रशासन अधिकारी पी‌.एम.चौगुले, विस्तार अधिकारी विनोद जाधव, कृषी विस्तार अधिकारी ए.जी.पाटील, विस्तार अधिकारी किरण लिंबाळकर, कनिष्ठ प्रशासन अधिकारी प्रविन लिंबाळकर, राजेंद्र कांबळे, ग्रामसेवक एन.बी.भोरे, एस.के.मोरे, डी.एस‌.इंगळे, बी.एस‌.जटटे, एन.ए.शिनगारे, आशिष गोरे, लेखपाल नवगडे, शरण माळी, यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, ग्रामसेवक, लिपिक उपस्थित होते.
 
Top