Views
*पल्स पोलिओ लसीकरणाचे शहरी भागासाठी 170 केंद्र...*

उस्मानाबाद:-(प्रतिनिधी)

राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम दि.31 जानेवारी -2021 रोजी राबविण्यात येत आहे.या मध्ये शून्य ते पाच वर्षे वयोगटातील सर्व बालकांना पोलिओ डोस पाजण्यात येणार आहे.यासाठी उस्मानाबाद जिल्हा शहरी विभागात एकूण 170 लसीकरण बूथ (केंद्र)ची सोय करण्यात आलेली आहे.अनुक्रमे-उस्मानाबाद येथे 59, तुळजापूर-23, नळदुर्ग-22, उमरगा-19, मुरुम-15,कळंब-16,भूम-8,परंडा-8,याप्रमाणे लसीकरण बूथ केंद्रांची सोय करण्यात आली आहे. याशिवाय बसस्थानक ,बाजार,बांधकाम,टमटम स्टँड,सेल्स आदी ठिकाणी ट्राम्झीट टिम ची विशेष व्यवस्था करण्यात आलेली आहे.सर्व पालकांनी दि.31 जानेवारी 2021 रोजी सकाळी 8 ते 5 या वेळेत आपल्या नजीकच्या लसीकरण केंद्रावर जावुन शून्य ते पाच वर्षातील सर्व बालकांना पोलीओचे डोस आवश्य पाजून घ्यावा,असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.डी.के.पाटील यांनी केले आहे.
 
Top