Views


*पत्रकारांचा गौरव सोहळा संपन्न*

उस्मानाबाद:-(प्रतिनिधी)

उस्मानाबाद जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने दर्पण दिनाच्या निमित्ताने आज मंगळवारी दुपारी उस्मानाबाद जिल्ह्यातील विविध दैनिकांच्या तसेच वृत्त वाहिन्यांच्या प्रतिनिधींचा गौरव करण्यात आला.शहरातील समर्थ सभागृहात अत्यंत दिमाखात हा सोहळा पार पडला. जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजयकुमार फड,जिल्हा माहिती अधिकारी यशवंत भंडारे,जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष चंद्रसेन देशमुख (दिव्य मराठी), सरचिटणीस भिमाशंकर वाघमारे (पुढारी), ज्येष्ठ पत्रकार अनंत अडसूळ,चित्रसेन राजेनिंबालकर आदी मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमात पत्रकारांना नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबालकर यांच्या वतीने काढण्यात आलेल्या विमा पॉलिसीचे वितरण करण्यात आले.
तसेच उस्मानाबाद व्हिजन 2021 या विषयावर जिल्हाधिकारी दिवेगावकर व सीईओ डॉ.फड यांनी मांडणी केली. 
     सूत्रसंचालन पत्रकार संघाचे उपाध्यक्ष देविदास पाठक, रवी केसकर यांनी केले.यावेळी राहुल कुलकर्णी,काकासाहेब कांबळे (abp माझा),चेतन धनुरे,बाबुराव चव्हाण,विकास सुर्डी (लोकमत),सयाजी शेळके (सकाळ),कमलाकर कुलकर्णी, राकेश कुलकर्णी (सामना),रवी केसकर,अमोल गाडे (संचार,लोकसत्ता),देविदास पाठक(दूरदर्शन, आकाशवाणी),राजा वैद्य (भास्कर),संतोष हंबीरे (संघर्ष),बाळासाहेब माने (दिव्य मराठी), बालाजी निरफळ(न्यूज 18 लोकमत),ज्ञानेश्वर पतंगे (zee 24 तास),बालाजी सुरवसे(lok शाही न्यूज), प्रशांत कावरे (मराठवाडा नेता),अजहर शेख (टाईम्स नाऊ), मल्लिकार्जुन सोनवणे(यशवंत),मच्छिंद्र कदम,प्रा.अभिमान हंगरकर (एकमत),सुधीर पवार(लोकपत्र) यांच्यासह ज्येष्ठ पत्रकार दिलीप पाठक-नारीकर,महेश पोतदार, विठ्ठल पाटील, छायाचित्रकार कालिदास म्हेत्रे, आरिफ शेख, इस्माईल सय्यद,सागर काळे,सलिम पठाण,संतोष खुणे,पांडुरंग मते,प्रभाकर लोंढे आदी उपस्थित होते.
 
Top