Views




*यशदा च्या नावाप्रमाणे काम करणारी संस्था म्हणजे यशदा मल्टीस्टेट - दत्ताभाऊ कुलकर्णी*

उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

सातत्याने आपल्या यशाचा आलेख उंचावत ठेवत काम करणारी संस्था म्हणजे यशदा मल्टीस्टेट आहे असे प्रतिपादन सिद्धिविनायक परिवाराचे संस्थापक अध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी केले. यशदा मल्टीस्टेट च्या 2021 च्या कॅलेंडर प्रकाशन सोहळाच्या वेळी ते बोलत होते. यावेळी सी.ए. सचिन शिंदे ,पवनराजे मल्टिस्टेट चेअरमन जयराजे निंबाळकर ,प्रगती पतसंस्था चेअरमन प्रशांत पाटील, भाई उद्धवराव पाटील शिक्षक पतसंस्था सचिव अमरसिंह देशमुख, डॉ.पद्मसिंह पाटील शिक्षक पतसंस्था चेअरमन विक्रम पाटील, पद्मिनी पतसंस्था चेअरमन सिद्धेश्वर मोरे, सी.ए. पूजा लड्डा, उस्मानाबाद जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष चंद्रसेन देशमुख, दैनिक सकाळचे जिल्हा प्रतिनिधी सयाजी शेळके, डॉ. कुलदीप सस्ते, एकता फाउंडेशन अध्यक्ष अमित कदम, योगीराज निधी लि.चेअरमन शशांक सस्ते, ग्यानराज काकडे, यशदा मल्टीस्टेट चे मुख्य कार्यकारी आधिकारी प्रकाश गरड, एकता फाउंडेशन चे सचिव अभिलाष लोमटे, यशदा मल्टिस्टेट चे संचालक वैभव देशमुख व सचिन शेटे आदींची उपस्थिती होती. संस्थांना येणाऱ्या अडचणींवर मात करत काम करणाऱ्या संस्थेची प्रगती कोणीही रोखू शकत नाही असे ही मत यावेळी दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी व्यक्त केले. येडशी सारख्या ग्रामीण भागातून पुढे येऊन यशदा परिवाराच्या माध्यमातुन वेगवेगळे उद्योग सुधीर सस्ते यांनी उभे केले हि बाब अत्यंत कौतुकास्पद आहे असे मत पवनराजे मल्टीस्टेट चेअरमन जयराजे निंबालकर यांनी व्यक्त केले. या वेळी जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष चंद्रसेन देशमुख यांनी ही मनोगत व्यक्त करून यशदा परिवाराला पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकपर भाषणात सुधीर सस्ते यांनी संस्था करत असलेले कार्य सांगत संस्थेचे उद्दिष्ट सर्वांसमोर ठेवत कार्यक्रम आयोजनामागची भूमिका व्यक्त केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन आभिलाष लोमटे यांनी केले. तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यशदा मल्टीस्टेट च्या सर्व कर्मच्याऱ्यांनी परिश्रम घेतले.
 
Top