Views


*पत्रकार नीलकंठ कांबळे यांना ग्रामीण उत्कृष्ट पुरस्कार जाहीर*

उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

उमरगा तालुका पत्रकार संघाच्या वतीने देण्यात येणारा ग्रामीण उत्कृष्ट पुरस्कार लोहारा येथील पत्रकार निळकंठ कांबळे यांना जाहीर झाला आहे. उमरगा पत्रकार संघाचे अध्यक्ष अविनाश काळे, सचिव अंबादास जाधव, कार्याध्यक्ष विलास वाडेकर, उपाध्यक्ष रविकिरण अंबुसे यांनी जाहिर केला आहे. 
दर्पण दिनानिमित्त पत्रकार पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. उमरगा तालुका पत्रकार संघाचे पुरस्काराचे दुसरे वर्ष आहे. तालुक्यात अनेक ज्येष्ठ पत्रकारांनी पत्रकार क्षेत्रात लौकिक निर्माण केला असून आजच्या स्थितीत ही प्रिंट मीडिया चांगली कामगिरी करीत आहे. पुरस्काराच्या माध्यमातून उत्कृष्ट काम करणाऱ्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून यंदाचा उत्कृष्ट ग्रामीण पत्रकार पुरस्कार निळकंठ कांबळे यांना जाहीर झाला आहे. हा पुरस्कार जाहीर झाल्यामुळे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
 
Top