Views

*जाणीव अस्मितेची साहित्य परिषदचे विविध क्षेञातील मान्यवरांना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर*

उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

जाणीव अस्मितेची साहित्य परिषद ,उस्मानाबाद जिल्हा शाखेच्या वतीने साहित्य व सामाजिक आणि पञकारिता क्षेञात उल्लेखनीय कार्य केलेले आहे व करत आहेत व ज्यांच्या कार्याचा समाजाला अभिमान वाटतो आहे.व ज्यांचे अनमोल असे कार्य समाजाला व देशाला बळ देणारे आहे. ज्यांचे हे महान कार्य नवीन पिढीस प्रेरणादायी आहे.त्यांच्या कार्याचा सन्मान व्हावा.यासाठी वरील तीन क्षेञातील मान्यवरांना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. साहित्य *क्षेञात सातत्यपूर्ण लेखण करणारे साहित्यिक प्रा.डाॅ.बी.जी.श्रीरामे(जालना)*
*वसामाजिक क्षेञात सदैव कार्य करणाऱ्या अॅड.भारती* *रोकडे (उस्मानाबाद) आणि* *पञकारिता क्षेञात नेहनी नाविन्यपुर्ण बातम्यांचा शोध घेणारे पञकार सुमेध वाघमारे*(तेर—उस्मानाबाद या मान्यरांना हे पुरस्कार जाहीर झाले आहेत. सदर पुरस्काराची घोषणा जाणीव अस्मितेची साहित्य परिषद म.राज्य अध्यक्ष मा.साहित्यिक राम गायकवाड (जालना ) यांचे मार्गदर्शनाखाली प्रा.राजा जगताप (जाणीव अस्मितेची साहित्य परिषद म.राज्य उपाध्यक्ष) व विकास कांबळे (उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष जाणीव अस्मितेची साहित्य परिषद)यांनी सदर पुरस्काराची घोषणा केली आहे.सदर राज्यस्तरीय पुरस्कार वितरण समारंभ. उस्मानाबाद येथे रविवार दि.१७ जानेवारी २०२१ दू.१=००वाजता आयोजित करण्यात आला आहे. वरील मान्यवरांना सदर आयोजित समारंभात ज्येष्ठ साहित्यिक राम गायकवाड, जालना यांचे हस्ते सन्मानपञ, सन्मानचिंन्ह, शाल, बुके देऊन गौरविण्यात येणार आहे.

 
Top