Views


*सामाजातील तुटलेला संवाद पत्रकारांनी जोडने गरजेचे - मंदार फणसे*

कळंब:-(प्रतिनिधी)
 
पत्रकारांनी काळानुार बदलण-या गोष्टी कडे लक्ष देवून 20 -25 वर्षापुर्वीची पत्रकारीता याची तुलना करुन हरवलेला प्रत्यक्ष संवाद जोडत समाज घटकांना घेवून वैचारीक दृष्टया परीपक्व पत्रकारीता करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन न्युज मिरर नाउ चे संपादक मंदार फणसे यांनी केले. ते कळंब तालूका पत्रकार संघाने आयोजीत केलेल्या पत्रकारांचा कौतूक सोहळा या कार्यक्रमात बोलत होते. दि.10 जानेवारी रोजी कळंब येथील मोहेकर महाविद्यायाच्या सभगृहात का सोहळा संपन्न झाला. यावेळी खासदार ओमप्रकाशराजे निंबाळकर, आमदार कैलास घाडगे पाटील, राजिकीय विश्लेक अभय देशपांडे, अखिल भारतीय मराठी साहित्य परीषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोरे,मंत्रालय पत्रकार संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे, ह भ प प्रकाश महाराज बोधले, राष्ट्रवादी काॅग्रेसचे तालूका अध्यक्ष श्रीधर भवर, उपनगराध्यक्ष संजय मुंदडा, शिवसेना तालूका प्रमुख शिवाजी कापसे, भाजप तालूका अध्यक्ष अजित पिंगळे, संघाचे विश्वस्त सतिश टोणगे, अध्यक्ष परमेश्वर पालकर यांची उपस्थीती होती. 
 दर वर्षी प्रमाणे याही वर्षी कळंब तालूका पत्रकार संघाच्या वतीने पत्रकारांचा कौतूक सोहळा आयोजीत केला होता. यावेळी न्युज मिरर नाउ चे संपादक मंदार फणसे यांनी उपस्थीतांना संवाद साधताना म्हणले की, साहसी मानूस एक सदृढ असा समाज उभा करु शकतात आणी ते साहस निर्माण करण्याचे काम पत्रकारांचे असून यामध्ये प्रत्यक्ष संवाद हा महत्वाचा भाग असल्याचे ते म्हणाले. पत्रकार हा केाणत्या विशीष्ट धर्माचा, गटाचा, पक्षाचा असूच शकत नाही, भारतीय संवीधान डोळया समोर ठेवून पत्रकारीता करणारा खरा पत्रकार असल्योच परखड मत यावेळी त्यांनी व्यक्त केले. यावेळी अखिल भारतीय साहित्य परीषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोरे यांनी मार्गदर्शन करताना सांगीतले की, पत्रकारांचे मुल्य हे त्यांच्या वयक्तीक वैचारीक मुल्यांवर आधारीत आहे. समाजातील निर्णायक काम करणारा घटक म्हणजे पत्रकार असतो त्यासाठी पत्रकारांच्या हिताचे निर्णय शासणाने घेतले पाहीजेत असे मत त्यांनी व्यक्त केले. कार्यक्रमासाठी पत्रकार संघाचे विश्वस्त सतिश टोनगे यांच्या मार्गदर्शणाखाली सर्व सदस्यांनी 
परीश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्तावीक कळंब तालूका पत्रकार संघाचे अध्यक्ष परमेश्वर पालकर यांनी केले, सुत्रसंचलन प्राचार्य जगदीश गवळी यांनी तर आभार रमेश अंबीरकर यांनी मानले. 
ःचैकट: 
यांचा झाला सन्मान: 
शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार शाहू पाटोळे, कै शिवशंकर बप्पा घोंगडे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार संजय मिस्किन, कै रा ई काकडे ग्रामीण पत्रकारिता पुरस्कार प्रमोद वेदपाठक, कै गणेश घोगरे पत्रकारिता पुरस्कार भिमाशंकर वाघमारे, स्व शकुंतला देशपांडे स्मृती समाजसेवा पुरस्कार अशोक देशमाने, कै सुधाकर सावळे पत्रकारिता पुरस्कार प्रशांत बर्दापूरकर, कला गौरव पुरस्कार राजकुमार कुंभार, रूग्ण सेवा पुरस्कार उपजिल्हा रुग्णालय कळंब, धडपड्या युवा पुरस्कार बाळासाहेब काळे, सोशल मीडिया पुरस्कार सतिश मातने, कै शिवशंकर बप्पा घोंगडे पेन्शन योजना सन्मान सुभाष घोडके या सर्वाना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 
ःचैकट: 
पत्रकार भवना साठी 10 लाखांचा निधी: 
पत्रकार संघाचे अध्यक्ष परमेश्वर पालकर यांनी त्यांच्या प्रास्तावीकात कळंब येथील पत्रकार संघाचे कामकाज व कार्य सांगताना पत्रकारांना पत्रकार भवणाच्या बांधकामासाठी उपस्थीत आमदार व खासदार यांना निधीची मागणी केली होती. आमदार कैलास पाटील यांनी तात्काळ पत्रकार भवणासाठी स्थानीक विकास निधीतून 10 लाख रुपयांच्या मंजूरीचे पत्र दिले. खासदार ओमप्रकाश राजे निबांळकर यांच्या हस्ते निधी मंजूरीचे पत्र पत्रकार संघाच्या पदाधिका-यांकडे सुपूर्त करण्यात आले.

चौकट
शिवसेना तालुकाप्रमुख शिवाजी कापसे यांच्या पुढाकाराने खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील यांच्या सहकार्याने तालुक्यातील पञकारांचा करोना रक्षण म्हणून विमा उतरविला होता याचा एक लाखाचा धनादेश करोना काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून पञकारीता करत असताना कोविड ची लागण झालेले पत्रकार शिवप्रसाद बियाणी यांना या कार्यक्रमात वाटप करण्यात आला

चौकट
विकासकामांसाठी आग्रही - खा ओमराजे निंबाळकर
आम्ही विकासाच्या कामात कुठेही आडवे येत नाहीत तर विकास झाला पाहिजे यासाठी आमची आग्रही भूमिका आहे. मी व आमदार कैलास पाटील हे उस्मानाबाद येथे मेडिकल कॉलेज, कृष्णा खोरे पाण्यासह विविध लोकाभिमुख कामांसाठी आग्रही असुन आम्ही हे कामे पुर्ण करूनच घेणार आहोत तसेच पत्रकारानी या साठी सहकार्य करावे असे आवाहन केले.

चौकट 
माझा दृष्टीकोन सकारात्मक - आ कैलास पाटील
माझा पत्रकारिता व पत्रकारांच्या बातम्याकडे मी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून पहातो व वर्तमानपत्रात आपण मांडलेले प्रश्न मी सोडविण्यासाठी सतत प्रयत्नशील असतो. पत्रकारांच्या मागण्या मी निश्चितच सभागृहात मांडून सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

चौकट
दुर्गाबाई घोंगडे व सावळे यांचा गौरव
कळंब तालुका पत्रकार संघाचे संस्थापक कै स्वातंत्र्यसैनिक शिवशंकर घोंगडे यांच्या पत्नी श्रीमती दुर्गाबाई घोंगडे यांचा पत्रकार संघाच्या वतीने विशेष गौरव गौरवपत्र देऊन करण्यात आला. तसेच दविंगत पत्रकार सुधाकर सावळे यांच्या पत्नी अॅड शकुंतला फाटक सावळे यांचाही सन्मान करण्यात आला.
 
Top