Views


*वसंतराव मुळे यांचा ग्रंथतुल करुन सेवानिवृतीचा निरोप*

उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

 उमरगा तालुक्यातील नारंगवाडी येथील वसंतराव मुळे यांचा सेवानिवृती आगळा वेगळा कार्यक्रमाने पार पडला. महावितरणमध्ये वरिष्ठ तंञज्ञ पदावरुन सेवा करत असलेले कवठा येथे सेवानिवृत झाल्यानंतर घरचा मंडळीने नारंगवाडी येथे अगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करुन वसंतराव मुळे शालुबाई मुळे याचा ग्रंथासोबत वजनतुल करुन दरजेदार पुस्तकाचे गावातील सांप्रदायक मंडळ व कार्यक्रमास उपस्थित आसलेल्यांना ग्रंथाचे वाटप करण्यात आले. सेवानिवृत नंतर विविध क्षेञातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी मोहन मुळे अधिक्षक शालेय पोषण आहार संचालक पुणे, पल्लवी मुळे सह्यायक प्रकल्प अधिकारी आदिवासी विकास संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे, पोलिसपाटील हेंमतराव पाटील, चेअरमन शेषेराव पवार, राजेद्रं चव्हाण,पंडित मुळे, अनिल शेळके, पञकार विठ्ठल चिकुंद्रे, यशवंत मुळे,भाग्यवंत मुळे, सोमनाथ घोडके, गणेश पवार, प्रदिप सांगवे,नितीश ठाकुर, खंडु पवार, सुधीर शेळके, अक्षय जाधव, आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुञसंचालन गोपाळ आष्टे यांनी केले तर आभार अमोल चव्हाण यांनी माणले.
 
Top