Views


*योग व सांस्कृतिक क्षेत्रातील राज्यस्तरीय पुरस्काराने आशिष झाडके सन्मानित*  

उस्मानाबाद:- (प्रतिनिधी)

     महाराष्ट्र राज्य व्यसनमुक्ती परिषद च्या वतीने देण्यात येणारा योग व सांस्कृतिक क्षेत्रातील पुरस्कार आशिष झाडके व शिवानी झाडके यांना देऊन गौरविण्यात आले. नुकतेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्वास व्यसनमुक्ती परिसदेच्या वतीने पुरस्कार प्रदान करण्यात आले . यात आशिष व शिवानी झाडके यांना योग व सांस्कृतिक क्षेत्रातील कार्याची दखल घेवून हा पुरस्कार व्यसनमुक्ती परिषदेचे अध्यक्ष डॉ संदीप तांबारे, डॉ सुधाकर गुळवे, डॉ शशिकांत बदाने, डॉ कुमार देशमुख, डॉ विजयकुमार यादव, डॉ पल्लवी तांबारे या मान्यवरांच्या उपस्थितीत वितरित केला . कार्यक्रम येडाई व्यसन मुक्ती केंद्र येरमाळा येथे संपन्न झाला.
 
Top