Views


*दहावी बारावीच्या परीक्षा लांबणीवर वर्षा गायकवाडांची माहिती...*

उस्मानाबाद:-(प्रतिनिधी)
कोरोनामुळे लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे शाळांपासून, महाविद्यालयं आणि सर्वच शिक्षण संस्थांवर परिणाम झाला आहे. परिस्थितीत हळूहळू पूर्ववत होत असल्याचे दिसत आहे. अशातच शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी १२ वी आणि १० वीच्या स्टेट बोर्डाच्या परीक्षांच्या अपेक्षित तारखा सांगितल्या आहेत. यंदा १० वी स्टेट बोर्डाच्या परीक्षा १ मेनंतर आणि १२ वीच्या परीक्षा १५ एप्रिलनंतर अपेक्षित असल्याचं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं.तर पुढील परिस्थितीतवर इयत्ता ५ ते इयत्ता ८ वीपर्यंत राज्य शालेय माध्यम शाळा सुरु करण्याचे ठरवण्यात येईल.
 
Top