Views


*स्वातंत्र्यसैनिक नामदेवराव व्हटकर यांचे निधन*

उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

 उस्मानाबाद शहरातील ज्येष्ठ काँग्रेस नेते, स्वातंत्र्यसैनिक व दलितमित्र नामदेवराव गिरजाप्पा व्हटकर (वय 91) यांचे रविवार, दि. 3 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. व्हटकर यांच्यावर उस्मानाबाद येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या पार्थिवावर रविवारी दुपारी 3 वाजता त्यांच्या मूळ गावी उपळा (मा.) येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, तीन मुली, नातवंडे, पणतू, असा परिवार आहे. नामदेव व्हटकर हे जिल्हा लोकल बोर्ड, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य होते. तसेच संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाचे संचालक, महाराष्ट्र राज्य कृषी व ग्रामीण विकास बँकेचे सदस्य, भोगावती सहकारी साखर कारखाना वैरागचे संचालक, अशा विविध शासकीय व निमशासकीय संस्थांमध्ये त्यांनी काम केले होते.
 
Top