Views

*प्रा.प्रभाकर गायकवाड यांना पीएच. डी.पदवी प्रदान*

उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

शंकरराव जावळे पाटील महाविद्यालय, लोहारा येथील समाजशास्त्र विभाग प्रमुख प्रा.प्रभाकर गायकवाड यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड अंतर्गत पीएच.डी. प्रदान करण्यात आली. त्यांनी 'भटक्या जमातीतील स्त्री जीवन - उस्मानाबाद जिल्ह्यातील पारधी स्त्रियांचा समाजशास्त्रीय अभ्यास' या विषयावर संशोधन केले असून प्रा. डॉ.विनोद जाधव, मास्टर दीनानाथ मंगेशकर महाविद्यालय, औराद शहाजनी यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधनाचे कार्य पूर्ण केले आहे. त्यांना पीएच.डी.पदवी प्रदान झाल्याबद्दल त्यांचे भारतीय राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष दिनकरराव जावळे पाटील तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य बी.बी. मोटे यांनी अभिनंदन केले. त्याचप्रमाणे विनोद जावळे पाटील, महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.
 
Top