Views


*मुरुम येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी*       

उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

मुरुम येथील श्री माधवराव पाटील महाविद्यालयात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व श्री माधवराव पाटील महाविद्यालयाच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची 190 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी प्राचार्य डॉ.अशोक सपाटे यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी अंनिसचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा.डॉ.महेश मोटे, डॉ.आप्पासाहेब सुर्यवंशी, डॉ. शिला स्वामी, डॉ.सोमनाथ बिरादार, डॉ.विलास खडके, लालअहमद जेवळे, व्यंकट मंडले आदींसह विद्यार्थीनी उपस्थित होत्या. यावेळी मनोगत व्यक्त करताना डॉ. शिला स्वामी यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.अशोक सपाटे यांनी अध्यक्षीय समारोप करताना मुलींनी सावित्रीबाई फुले यांच्या विचाराचा वसा आणि वारसा चालविला पाहिजे असे मत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सुधीर पंचगल्ले यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.नागनाथ बनसोडे यांनी केले तर तर आभार दत्तु गडवे यांनी मानले. यावेळी विद्यार्थीनी बहुसंख्येने उपस्थित होत्या.
 
Top