Views
*अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या 28 व्या वर्धापन दिनी घेण्यात आलेल्या ऑनलाइन निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरणाचा कार्यक्रम सावित्रीमाई फुले यांच्या जयंती निमित्त उस्मानाबाद शहरात संपन्न*

उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या 28 व्या वर्धापन दिनी घेण्यात आलेल्या ऑनलाइन निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण कार्यक्रम दिनांक 3 जानेवारी 2021 रोजी महात्मा फुले चौक उस्मानाबाद येथे सावित्रीमाई फुले यांच्या जयंती निमित्त तहसीलदार गणेश माळी यांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये नववी ते बारावीच्या गटातील विजेते आहेत प्रथम वेदांत दत्ता गोरे, उस्मानाबाद, द्वितीय नरेंद्र शंतनू सुरवसे, उस्मानाबाद, तृतीय पुनम पांडुरंग भोजने कळंब, सहावी ते आठवी वयोगटातील विजेते प्रथम क्रमांक रोहन परशुराम शेरखाने लातूर, द्वितीय क्रमांक सलोनी सुनील बहरे माहूर, नांदेड तृतीय श्रेया धनंजय गोरे कळंब, पहिले ते पाचवी वयोगटातील विजेते प्रथम वेदिका सौदागर गोरे उस्मानाबाद, द्वितीय समर्थ अनिल यादव करमाळा, तृतीय तेजस्विनी गणेश घुले हडपसर पुणे, चौथा क्रमांक विवेक शशिकांत वागत शेटफळ, पाचवा क्रमांक अथर्व युवराज बनकर करणखेडा तसेच या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले.
 
Top