Views


*शिक्षण महर्षि सुभाषदादा कोळगे सहकारी पतसंस्थेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन*

उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)
 
शिक्षण महर्षि सुभाषदादा कोळगे सहकारी पतसंस्थेच्या 2021 वार्षिक दिनदर्शिकेचे प्रकाशन मंगळवारी दि.5 जानेवारी रोजी जिल्हा उपनिबंधक विश्वास देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. उस्मानाबाद शहरातील समर्थनगर येथील संस्थेच्या कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या दिनदर्शिका प्रकाशन कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा उपनिबंधक विश्वास देशमुख यांची उपस्थिती होती. यावेळी संस्थेचे ज्येष्ठ सभासद गिरीष कुलकर्णी यांच्या हस्ते मान्यवरांचे स्वागत व सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रामदास कोळगे यांनी संस्थेविषयीची माहिती दिली. यावेळी जिल्हा उपनिबंधक देशमुख यांनी संस्था गेली दहा वर्षापासून दिनदर्शिका प्रकाशन करीत असल्याचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी संस्थेचे सचिव जयपाल शेरखाने, सभासद अजित बडवे, मुकेश गायकवाड, श्रीकांत काशिद, नागनाथ सांळुके, भुजंग गंगावणे, यांच्यासह सर्व कर्मचारी, पिग्मीएजंट उपस्थित होते.
 
Top