Views*वैद्यकीय महाविद्यालय मंजुरीबद्दल आरोग्य मंत्री टोपे यांचा पत्रकार संघाच्या वतीने सत्कार*

उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

 राज्य शासनाने उस्मानाबाद येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर केल्याबद्दल जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे यांचा सत्कार करण्यात आला़. उस्मानाबाद येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करण्याची अनेक वर्षापासूनची मागणी होती़. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने नववर्षाच्या प्रारंभीच मकरसंक्रातीच्या पूर्वसंध्येस गोडभेट देत याला मंजुरी दिली़बहुप्रतिक्षीत वैद्यकीय महाविद्यालयाची मागणी मंजूर केल्याबद्दल राज्याचे आरोग्य मंत्री टोपे यांचा मराठी पत्रकार संघाच्या वतीने अध्यक्ष धनंजय रणदिवे, सरचिटणीस संतोष जाधव, सहसरचिटणीस राजाभाऊ वैद्य यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला़. यावेळी राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे, खा़ ओमप्रकाश राजेनिंबाळकर, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ़.विजयकुमार फड, आरोग्य उपसंचालक एकनाथ माले, कॅमेरामन सचिन चंदनशिवे, आदी उपस्थित होते़.
 
Top