Views*लोहारा तालुक्यातील नागुर येथे श्रीराम मंदिर निर्माण व जनजागरण अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद*

उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)
   
लोहारा तालुक्यातील नागुर येथे श्रीराम मंदिर निर्माण व जनजागरण अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नागुर गावात दिनांक 18 जानेवारी रोजी काढण्यात आलेल्या "रामदिंडी" मध्ये ग्रामस्थांनी सहभागी होवून निधी संकलन करण्यात आले. यावेळी गावातील नागोबा मंदिर येथून बैलगाडीला सजवून त्यामध्ये श्रीराम मूर्ती ठेवून गावातून दिंडी काढण्यात आली. गल्लोगल्ली महिलांनी रस्त्यावर सडा टाकून सुंदर रांगोळ्या काढून दिंडीचे पूजन व सहभागी कारसेवकांची आरती करून त्यांच्यावर फुले उधळली. यानंतर हनुमान मंदिराजवळ सियावर रामचंद्र की जय अशा घोषणा देण्यात आल्या. अभियानाचे प्रास्ताविक लोहारा तालुका निधी व हिशोब प्रमुख शहाजी जाधव यांनी केले. श्रीराम मंदिर निर्माण व जनजागरण अभियान या विषयी माहिती सांगताना शंकर जाधव म्हणाले की, 500 वर्षांपासून मंदिरासाठी सुरू असलेला लढा देत असताना शेकडो कारसेवकांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले, यापूर्वी यासाठी देशभरातून रथयात्रा, शिलापुजन, एकात्मता यात्रा काढण्यात आली होती. आणि प्रदीर्घ काळ चाललेल्या न्यायालयीन लढाई नंतर 2019 मध्ये मा. सर्वोच्य न्यायालयाच्या निर्णयानंतर 5 ऑगस्ट 2020 रोजी पंतप्रधानांच्या हस्ते अयोध्या येथे भव्य श्रीराम मंदिराचे भूमिपूजन करण्यात आले. हे मंदिर फक्त राममंदिर न राहता "राष्ट्रमंदिर" व्हावे यासाठी प्रत्येकाने खारीचा वाटा उचलावा असे आवाहन केले. याप्रसंगी ह.भ.प. बाबासाहेब जाधव, ह.भ.प.सत्यवान भांगे महाराज व ज्येष्ठ पत्रकार के. वाय. जाधव यांनी समर्पण निधी देवून आनंद व्यक्त केला. यावेळेस अभियानानिमित्त नागुर गावात काढण्यात आलेल्या रामदिंडी मध्ये श्रीराम जयराम जयजय राम असा रामनामाचा जपाने आणि श्रीरामाच्या घोषाने परिसर भक्तिमय झाले होते. याप्रसंगी लोहारा तालुका पालक दत्तात्रय दंडगुले, अभियानप्रमुख मुरलीधर होनाळकर, सहप्रमुख किशोर होनाजे, प्रा.यशवंत चंदनशिवे, मनोज तिगडे, व्यंकटेश पोतदार, शिवाजी पवार, नागुरचे सरपंच गजेंद्र जावळे, कारसेवक दत्ता सलगरे, प्रकाश चंदनशिवे, वामन लोहटकर, बबन जावळे, अंगद पाटील, रणजित पवार, मारुती मोरे, नागनाथ भजनी मंडळ, तरुण, महिला, यांच्यासह, ग्रामस्थ 
मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Top