Views

*नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांना शुभेच्छा देऊन गावच्या विकासाच्या दृष्टीने कामे करण्याचे मार्गदर्शन करत आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा जाहीर सत्कार...*


कळंब:-(प्रतिनिधी)

 ग्रामपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने कळंब तालुक्यात मुसंडी मारण्याचे चित्र पाहायला मिळाले. विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर कळंब तालुक्यातील अजित पिंगळे यांनी भाजप मध्ये जाहीर प्रवेश केला व तालुकाध्यक्ष पदाचा भार सांभाळत भारतीय जनता पक्षाचे मुळे कळंब तालुक्यात मजबूत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. या नंतर प्रथमच ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागल्या व या निवडणुकीत जिल्ह्याचे नेते तथा तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील व विधान परिषद सदस्य सुजितसिंह ठाकुर यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली कळंब तालुक्यात 42 ग्रामपंचायतीमध्ये भाजपाचे कमळ उगवण्याचे चित्र प्रथमच पहावयास मिळाले या अनुषंगाने काल दिनांक 20 जाने. रोजी भारतीय जनता पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयात नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार सोहळा आयोजित केला होता, 
     यावेळी आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार करून आगामी काळात गावाच्या विकासाच्या दृष्टीने कुठल्या पद्धतीने काम करता येईल यावर मार्गदर्शन केले व पुढील कामासाठी शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमात तालुकाध्यक्ष अजित पिंगळे,विकास बारकुल, पंडित टेकाळे,रामहरी शिंदे, बजरंग शिंदे,अनिल टेकाळे व तालुक्यातील नेते, पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top